मुंबई - सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीतून बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते. परस्पर हितसंबंध जपण्याच्या नियमामुळे त्यांना या समितीवर काम करता येणार नसल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. त्यामुळे सचिन, सौरव व लक्ष्मण यांच्या एकाच वेळी आउट होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर आहे, तर लक्ष्मणही आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाचा सल्लागार आहे. तेंडुलकरचा मुलगा अर्जुन भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा सदस्य असल्याने त्यालाही या समितीवर कायम राहता येणार नाही. 2015 मध्ये नरेंद्र हिरवाणी यांनी मध्य प्रदेश क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा मुलगा राज्याच्या संघात खेळत असल्यामुळे त्यांना नियमानुसार पदावरून पायउतार होणे भाग होते.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची नियुक्ती करण्याचा अधिकार सल्लागार समितीकडे आहे. 2016 मध्ये याच समितीने प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे यांचे नाव सुचवले होते, तर 2017 मध्ये त्यांनी रवी शास्त्री यांचे नाव पुढे केले. मात्र महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक नियुक्तीसाठी या समितीकडे विचारणा करण्यात आली नसल्याचे वृत्त समोर आले आहे.
Web Title: Sachin, Sourav, Laxman 'out' at the same time
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.