मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चौकारांच्या निकषावरून इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं चाहत्यांचा रोष ओढावून घेतला. केवळ क्रिकेट चाहतेच नव्हे, तर आजी माजी क्रिकेटपटूंनीही या नियमावर नाराजी व्यक्त केली. क्रिकेटच्या मैदानावर असे अनेक नियम किंवा प्रसंग घडत असतात की ज्यांची उत्तर देणं कोणालाही सहज शक्य होत नाही. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही असाच एक पेचात टाकणारा प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर तुम्हाला सापाडतंय का ते पाहूया....
इंडियन प्रीमिअर लीगम आणि वर्ल्ड कप स्पर्धे दरम्यान चेंडू लागूनही बेल्स न पडल्याचे प्रकार अनेकदा घडले. त्यामुळे काही वेळेला सामन्याचे चित्रही बदललेले पाहायला मिळाले. एका स्थानिक क्रिकेट सामन्यात असाच प्रसंग निर्माण झाला. जलदगती गोलंदाजाने टाकलेला चेंडू स्टम्प्सवर आदळला, परंतु बेल्स खाली न पडल्यानं फलंदाज नाबाद राहीला. तेंडुलकरने हाच व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यावर अडचणीत आणणारा प्रश्न विचारला आहे.
सचिन तेंडुलकरचा ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश सचिन तेंडुलकर याचा गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सन्मान केला. आयसीसीनं त्यांच्या हॉल ऑफ फेममध्ये तेंडुलकरच्या नावाचा समावेश केला. हा मान मिळणारा तो सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्यासह गुरुवारी दक्षिण आफ्रिकेचा अॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू कॅथरीन फित्झपॅट्रीक यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. यापूर्वी आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये भारताच्या बिशन सिंग बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे आणइ राहुल द्रविड यांचा समावेश करण्यात आला आहे. कुंबळे आणि द्रविड हे तेंडुलकर सोबत खेळलेले खेळाडू आहेत, परंतु त्यांना तेंडुलकरच्या आधी हा मान मिळाला आहे.
हॉल ऑफ फेमचा नियम काय सांगतो?तेंडुलकरला इतक्या उशीरा हॉल ऑफ फेमचा मान मिळण्यामागे एक नियम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पाच वर्षांनंतर हा मान एखाद्या खेळाडूला दिला जातो. तेंडुलकरने 14 नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. पण, कुंबळे आणि द्रविड यांनी त्याच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. द्रविडने 24 जानेवारी 2012, तर कुंबळेने 29 ऑक्टोबर 2008 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यामुळे हॉल ऑफ फेमसाठी ते प्रथम पात्र ठरले.