सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीची जोडी. 1996-97च्या नंतर या सलामीवीरांनी वन डे क्रिकेट गाजवलं आणि त्यांनी केलेला विक्रम आजही अबाधित आहे. तेंडुलकर आणि गांगुली यांनी 176 वन डे डावांत 47.55च्या सरासरीनं 8227 धावा केल्या. 2001मध्ये केनियाविरुद्ध त्यांनी 258 धावांची सर्वोत्तम भागीदारी केली.
स्टीव्ह स्मिथला चौथ्या चेंडूवर बाद करेन; Shoaib Akhtarच्या दाव्याची ICCनं उडवली खिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) मंगळवारी तेंडुलकर-गांगुली यांच्यातील एक विक्रम पोस्ट केला. ''वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकाही जोडीला मिळून 6000 धावा करता आलेल्या नाहीत.'' आयसीसीच्या या पोस्टवर उत्तर देताना तेंडुलकरनं माजी कर्णधाराला प्रश्न विचारला. तेंडुलकरनं लिहिलं की,''या फोटोनं जुन्या काळात नेलं. वर्तुळाबाहेर चार खेळाडूंचा नियम आणि दोन नवीन चेंडूंसह आपण आणखी किती धावा केल्या असत्या?'' असा प्रश्न तेंडुलकरनं केला.
त्यावर गांगुलीनं उत्तर दिलं की,'' 4000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा नक्की केल्या असत्या. दोन नवीन चेंडूंसह पहिल्या षटकापासून कव्हर ड्राईव्हवरून चौकार मारला असता आणि 50 षटकांपर्यंत तसाच खेळ कायम राहिला असता.''
तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमध्ये 463 सामन्यांत 18426 धावा केल्या आहेत आणि त्यात 49 शतकांचा समावेश असून नाबाद 200 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. गांगुलीनं 311 वन डेत 41.022च्या सरासरीनं 22 शतकांसह 11363 धावा केल्या आहेत. 183 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
... म्हणून हा सर्व आटापिटा; IPL 2020 रद्द होणं BCCIला परवडणारं नाही!
85 वर्षीय आजीच्या निःस्वार्थ सेवेला मोहम्मद कैफचा सलाम; तुम्हालाही वाटेल अभिमान
Video : MS Dhoniच्या नव्या लूकवर युजवेंद्र चहल म्हणतो, थाला वन मोर टाईम!
महेंद्रसिंग धोनीनं रागात बॅट फेकली अन् ड्रेसिंग रुममध्येही आदळआपट केली; इरफान पठाणनं सांगितला किस्सा
2008 मध्ये धोनीने कप्तानपद सोडण्याची दिली होती धमकी?, आरपी सिंगने सांगितले यामागील सत्य!
क्रिकेटपटू अन् बॉलिवूड अभिनेत्री यांच्या 14 बेस्ट रोमँटिक स्टोरी!
माझा मुलगा एवढाही वयस्कर झालेला नाही; व्हायरल फोटोवर MS Dhoniच्या आईची प्रतिक्रिया
सचिन तेंडुलकरपेक्षा धावांचा पाठलाग करण्यात विराट कोहली सरस; एबी डिव्हिलियर्स
Web Title: Sachin Tendulkar asks question sharing ICC's post; Sourav Ganguly replies svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.