Join us  

Road Safety World Series: स्टेडियममध्ये पुन्हा घुमला सचिन...सचिन'चा आवाज; तेंडुलकरची खेळी पाहून चाहत्यांना आठवले जुने दिवस

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज मधून पुन्हा एकदा क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर मैदानात परतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 3:10 PM

Open in App

नवी दिल्ली : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज मधून पुन्हा एकदा क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर (Sachin Tendulkar in Road Safety World Series) मैदानात परतला आहे. सचिन तेंडुलकरच्या जुन्या अवताराची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात सचिनला केवळ १६ धावा करता आल्या, मात्र असे असतानाही त्याने चाहत्यांना त्याच्या जुन्या दिवसांची झलक दाखवली आहे. या मालिकेतील पुढच्या सामन्यांमध्ये जुन्या सचिनची झलक पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. या सामन्यात स्टुअर्ट बिन्नी आणि सुरेश रैना यांनी शानदार खेळी केली आणि सचिनच्या इंडिया लीजेंड्स संघाने विजयी सलामी दिली. 

स्टेडियममध्ये पुन्हा घुमला सचिन...सचिन'चा आवाजकानपूरच्या ग्रीन पार्कवर झालेला हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टरची जुनी झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेडियममध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. संपूर्ण स्टेडियममध्ये सचिन...सचिन...च्या घोषणा दिल्या जात होत्या. या सामन्यातील सचिनचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये १९९६ च्या काळातील त्याची झलक पाहायला मिळत आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इतक्या वर्षांनीही त्याची खेळाबद्दलची समज आणि आवड सर्वांचे लक्ष वेधत आहे. 

...म्हणून खेळली जाते ही मालिकासचिन रोड सेफ्टीच्या मुद्द्यावरून जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होतो. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज इंडिया इव्हेंटचा उद्देश हा रस्ता आणि वाहतूक सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवणे आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिका लीजेंड्स, बांगलादेश लीजेंड्स, वेस्ट इंडिज लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स आणि न्यूझीलंड लीजेंड्स या संघांचा सहभाग आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्या सामन्यात इंडिया लिजेंड्स संघाने दक्षिण आफ्रिका लीजेंड्सचा पराभव केला.

 

टॅग्स :सचिन तेंडुलकररस्ते सुरक्षासुरेश रैनाभारतद. आफ्रिका
Open in App