- मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: अनेकदा असे म्हटले जाते की "एक चित्र हजार शब्द बोलते" आणि जेव्हा तुम्ही तिच्या चित्रांना भेटता तेव्हा क्वचितच शंका येते, की ही म्हण खोटी आहे. राधिका गायतोंडे- नेरुरकर ही शिवाजी पार्कची असामान्य प्रतिभा असलेली एक साधी महिला. मात्र आजच्या डिजिटलायझेशनच्या या जगात, राधिकाची चित्रे तुमचे हृदय वितळवण्यास बांधील आहेत.
सर्व काळातील महान कलाकारांपैकी एक लिओनार्डो दा विंची यांच्या प्रेरणेने, आता गोव्यात स्थायिक झालेल्या मुंबईच्या राधिकाने चित्रकलेच्या कॅनव्हासवर स्वतःचे नाव कोरले आहे. इलुस्ट्रेशनमध्ये मुख्य ठळक वैशिष्ट्यांसह ललित कला, लँडस्केप आणि पोर्ट्रेटमध्ये विशेषीकरणासह व्यावसायिक कलांचा तिने अभ्यास केला. एका सुंदर आणि भव्य कलेचे रूप धारण करणारी आणि मनाला भावणाती चित्रकला हे तिचे वैशिष्ट्य आहे. अलीकडच्या काळात तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर आणि तापसी पन्नू यांच्यासोबत तिने हुबेहुब काढलेली त्यांची चित्रे शेअर देखिल केली आहे.
जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला राधिकाची चित्रकला खूप भावली. माझा एक जवळचा मित्र आहे जो त्यांना चांगला ओळखतो आणि त्याने सचिनला माझी चित्रे दाखवली आणि त्याला ती खूप आवडली. तेव्हा सचिन म्हणाला, मला या कलाकाराला भेटायचे आहे. एके दिवशी जगातल्या क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी मला फोन केला आणि मला सांगितले की त्याला त्याचे आणि त्याच्या आईचे चित्र हवे आहे. त्याला माझे चित्र इतके आवडले की त्याने मला आणखी एक ऑर्डर दिली आणि मी आतापर्यंत पाहिलेले सुंदर चित्र असून तुम्ही एक उत्कृष्ट आणि वास्तववादी कलाकार आहात अशी दाद त्यांनी दिली आणि मी खूप भारावून गेले, असे राधिकाने सांगितले.
वयाच्या पाचव्या वर्षापासून मी या कलेकडे आकर्षित झाली आणि तिचे कुटुंब आणि विशेषत: आजोबांनीच तिला या उत्कटतेसाठी प्रेरित केले. मी केलेल्या प्रत्येक कलेत माझ्या आई आणि वडिलांनी मला नेहमीच साथ दिली. माझी आई माझी सर्वात मोठी टीकाकार आहे.लग्नानंतर आता माझे सासरे आणि सासू आणि पतीकडून समान समर्थन आणि प्रेम मिळाल्याबद्दल धन्यता वाटते असे तिने आवर्जून सांगितले. एखाद्या दिवशी एक कला प्रदर्शन उभारणे आणि तिच्या सहकारी कलाकारांना त्यांच्या उत्कटतेसाठी पाठिंबा हे तिचे मिशन आहे.