“स्वागत आहे लिटल चॅम्प!”; सचिन तेंडुलकरने खास शब्दांत दिल्या विराट-अनुष्काला शुभेच्छा

Sachin Tendulkar Congratulate Virat Kohli and Anushka Sharma: टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची बातमी विराटने नुकतीच दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 11:51 PM2024-02-20T23:51:12+5:302024-02-20T23:51:31+5:30

whatsapp join usJoin us
sachin tendulkar congratulations to virat kohli and anushka sharma for having baby boy | “स्वागत आहे लिटल चॅम्प!”; सचिन तेंडुलकरने खास शब्दांत दिल्या विराट-अनुष्काला शुभेच्छा

“स्वागत आहे लिटल चॅम्प!”; सचिन तेंडुलकरने खास शब्दांत दिल्या विराट-अनुष्काला शुभेच्छा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sachin Tendulkar Congratulate Virat Kohli and Anushka Sharma: टीम इंडियाचा दमदार फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची बातमी विराटने नुकतीच दिली. १५ फेब्रुवारीला विराट-अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. विराटने आपल्या मुलाचे नाव 'अकाय' असे ठेवले आहे. यानंतर आता देशभरातून विराट आणि अनुष्का यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या खास शब्दांत विराट आणि अनुष्काचे अभिनंदन केले आहे. 

आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमचा मुलगा आणि वामिकाचा धाकटा भाऊ अकाय याचे स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, आमच्या खासगी जीवनाचा आदर करावा. धन्यवाद, अशा शब्दांत विराट आणि अनुष्काने आपल्या चाहत्यांना संदेश दिला.

स्वागत आहे लिटल चॅम्प!

एक्सवर एक पोस्ट शेअर करत सचिन तेंडुलकरने विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या. अकायच्या आगमनाबद्दल विराट आणि अनुष्काचे अभिनंदन. तुमच्या सुंदर कुटुंबात एक अनमोल भर पडली आहे. नावाप्रमाणे तो तुमचे जग अनंत आनंद आणि हास्याने भरेल. कायम जपाव्यात अशा आठवणी तुम्हाला साठवता येतील. जगात आपले स्वागत आहे, लिटल चॅम्प!, असे सचिन तेंडुलकरने पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, विराटने आपल्या मुलाचे नाव अकाय ठेवले असून अकाय शब्द हा मूळ संस्कृत भाषेतला आहे. याचा स्पष्ट अर्थ म्हणजे शरीरहीन. ज्या व्यक्तीला शरीर नाही किंवा जो शरीरविरहित आहे, त्याला अकाय म्हणतात. अकाय शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे आकार किंवा स्वरूप नसलेले म्हणजेच निराकार. विराट कोहलीची पोस्ट व्हायरल झाली आहे. लहान बाळाला खूप आशीर्वाद देण्यास आणि जोडप्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात झाली आहे. अभिनेता रणवीर सिंग, सोनम कपूर, रकुल प्रीत सिंगसह अनेक सेलिब्रिटींनीही विराट आणि अनुष्काचे अभिनंदन केले आहे. 

Web Title: sachin tendulkar congratulations to virat kohli and anushka sharma for having baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.