Join us  

Sara Tendulkar share Fight Video : लंडनमध्ये सामना पाहायला पोहोचली सारा तेंडुलकर; खेळाडूंमध्ये झाली मारामारी, Video Viral

Sara Tendulkar share Fight Video : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर हिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 9:42 PM

Open in App

Sara Tendulkar share Fight Video : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर हिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावरील तिच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स मिळतातच, शिवाय ते वाऱ्यासारखे व्हायरलही होतात. तिने आज शेअर केलेली इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. साराने शेअर केलेली स्टोरी सोशल मीडियावर गाजत आहे. तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती रोलर हॉकीचा सामना पाहायला गेलेली, हे कळते.  

पण, सामन्यात जे घडले त्याची अधिक चर्चा सुरू आहे. २७ फेब्रुवारीला सकाळी ४-५ वाजता तिने ही स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात ती मित्र-मैत्रीणींसोबत रोलर हॉकीचा सामना पाहायला गेल्याचे दिसतेय. यात ती सामन्याचा आनंद घेताना दिसतेय. पण, या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये झालेल्या मारामारीचा तिला खूप आनंद आला आणि त्या मारामारीचा व्हिडीओ तिने स्टोरीत पोस्ट केला. 

पाहा व्हिडीओ... काही दिवसांपूर्वी साराचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.  त्यात सारा एका व्यक्तीसोबत होती. तो मुलगा साराच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता आणि सारानेही तिचं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं होतं. तो मुलगा कोण, हे नंतर उघड झालं होतं. पण आता साराचा लंच डेटनंतर एका मुलासोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सारा तेंडुलकरचा मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडतानाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती. त्यामुळे तिच्यावर चाहत्यांच्या नजरा खिळणं हे स्वाभाविकच होतं, पण त्या व्हिडीओमध्ये सारासोबत असलेली 'ती' व्यक्ती सारापेक्षा जास्त भाव खाऊन गेली. सारा हक्कासन रेस्टॉरंटमधून बाहेर येऊन आपल्या कारमध्ये बसत होती, त्यावेळी काही पत्रकार आणि फोटोग्राफर्सनी तिला गाठलं. साराबरोबर त्यावेळी तो तरूण मुलगाही होताच. साराने फोटोसाठी पोज दिली आणि नंतर लगेचच ती तेथून निघून गेली. 
टॅग्स :सारा तेंडुलकरसचिन तेंडुलकरसोशल व्हायरल
Open in App