कोरोना व्हायरसशी वारंवार लोकांना आवाहन करणाऱ्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं राज्य आणि केंद्र सरकारला मदत केली आहे. आपण केलेली मदत ही सचिनला कोणालाच सांगायची नव्हती, परंतु त्याच्या निकटवर्तीयांनी हे जाहीर केले. त्यामुळे सचिननं अजून मदत का केली नाही, अशी चर्चा करणाऱ्यांसाना मोठी चपराक बसली आहे. सचिन नेहमीच समाजकार्यात पुढे असतो आणि त्याच्याकडून आर्थिक निधीही देत असतो, असेही या निकटवर्तीयानं सांगितले.
सचिननं कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकराला प्रत्येकी 25 लाखांची मदत केली आहे. मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्रानं असे वृत्त प्रसिद्ध केले आहे. सचिन तेंडुलकरनं कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारला अनुक्रमे 25 लाख रुपये दिल्याचा दावा, इंग्रजी वृत्तपत्रानं केला आहे. पण, तेंडुलकरला याबाबतची कोठेही चर्चा करायची नसल्याचा दावाही या वृत्तपत्रानं केला आहे.
तेंडुलकरनं केलेल्या 50 लाखांपैकी 25 लाख हे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री मदत निधीत, तर 25 लाख हे पंतप्रधान मदत निधीत दिले जाणार आहेत. तेंडुलकरच्या जवळच्या व्यक्तीनं सांगितलं की,'' ही मदत केल्याचं सचिनला कोणालाही सांगायचं नव्हतं. यापूर्वीही त्यानं ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीत मोडलेला संसार उभा करण्यासाठी लोकांना 25 हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची ( 11.4 लाख) मदत केली होती. तेंडुलकर नेहमी मदत करतो. त्यानं त्याच्या खासदारकीचा पगार पंतप्रधान मदत निधीत दिला असून तो अपनालय या NGOला नेहमी सहकार्य करतो.''
याआधी महेंद्रसिंग धोनी, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली, इरफान व युसूफ पठाण यांनीही कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे. गांगुलीनं गरजूंना 50 लाख किमतीचे तांदुळ दिले आहेत, तर पठाण बंधुंनी मास्क वाटप केले आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन यानेही पंतप्रधान मदत निधीत आपले योगदान केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननेही राज्य सरकारला 50 लाखांचा निधी दिला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लाखमोलाची मदत; पुण्यातील रोजंदारी कामगारांना MS Dhoniचं आर्थिक सहाय्य
'गोल्डन गर्ल' Hima Dasचा पुढाकार; राज्य सरकारला दिला एका महिन्याचा पगार
Sachin Tendulkarच्या नावानं पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा गोलंदाज; पण का?