रमाकांत आचरेकर सरांच्या पुण्यतिथीला सचिन तेंडुलकर झाला भावुक, म्हणाला...

आचरेकर सरांचे २ जानेवारीला निधन झाले होते. सचिनचे डोळे तेव्हाही पाणावले होते. पण आज त्यांच्या पुण्यतिथीला सचिन भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 07:08 PM2020-01-02T19:08:45+5:302020-01-02T19:09:19+5:30

whatsapp join usJoin us
Sachin tendulkar is emotional about Ramakant Achrekar's death anniversary ... | रमाकांत आचरेकर सरांच्या पुण्यतिथीला सचिन तेंडुलकर झाला भावुक, म्हणाला...

रमाकांत आचरेकर सरांच्या पुण्यतिथीला सचिन तेंडुलकर झाला भावुक, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला रमाकांत आचरेकर सरांनी घडवले. आचरेकर सरांचे २ जानेवारीला निधन झाले होते. सचिनचे डोळे तेव्हाही पाणावले होते. पण आज त्यांच्या पुण्यतिथीला सचिन भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Image result for sachin tendulkar with achrekar sir

सचिनचा भाऊ अजित तेंडुलकर हा त्याला आचरेकर सरांकडे घेऊन गेला होता. त्यावेळी सचिन वांद्रे येथे कलानगरमध्ये राहायचा आणि आचरेकर सर यांचे नेट्स दादर येथे होते. आचरेकर सरांना सचिनमध्ये चसक दिसली होती. त्यामुळेच सरांनी अजितला सचिनला श्रारदाश्रम शाळेत प्रवेश घेण्यास सांगितला. कारण आचरेकर सर शारदाश्रम शाळेचे प्रशिक्षकही होते.

Image result for sachin tendulkar with achrekar sir

सचिनवर आचेरकर सरांनी विशेष लक्ष दिले होते. काही वेळेला तर ते आपल्या स्कुटरवरून सचिनला वेगवेगळ्या क्लबकडून खेळायला घेऊन जात. एकाच दिवशी सचिन एकापेक्षा जास्त सामनेही आचरेकर सरांमुळे खेळायचा. सचिनला आचरेकर सरांच्या नेट्समध्ये विनोद कांबळीसारखा मित्रही मिळाला.

Image result for sachin tendulkar with achrekar sir

गेल्यावर्षी आजच्याच दिवशी आचरेकर सरांचे निधन झाले होते. त्यावेळी सचिन हा त्यांच्याचबरोबर होता. आज सरांच्या पहिल्या पुण्यतिथीला सचिनने ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सचिनने आचरेकर सरांबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली सचिनने एक ओळ लिहिली आहे. 'तुमच्या आठवणी आमच्या मनात सदैव राहतील, आचरेकर सर,' असे सचिनने या फोटोखाली लिहीले आहे.

 

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरनं नववर्षात एक संकल्प केला आहे. 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणाऱ्या तेंडुलकरची जादू आजही क्रिकेट चाहत्यांमध्ये कायम आहे. त्यामुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या तेंडुलकरचा चाहतावर्ग अजूनही वाढतच आहे. तेंडुलकरही सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधत आला आहे. 2020च्या पहिल्याच दिवशी तेंडुलकरनं ट्विटरच्या माध्यमातून असाच संवाद साधला.. पण, यावेळी त्यानं एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना एक आवाहन केलं आहे. 

तेंडुलकरनं शेअर केलेल्या व्हिडीओत एक दिव्यांग खेळाडू क्रिकेट खेळताना दिसत आहे. मद्दा राम असं या खेळाडूचं नाव असून तो दोन्ही पायानं अपंग आहे. त्यामुळे फलंदाजी करताना चेंडू टोलावल्यानंतर तो हाताच्या साहाय्यानं धावताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर बॅट बदलण्यासाठी तो खेळपट्टीच्या मधोमध जाऊन सहकाऱ्याला बॅट देताना दिसत आहे. व्हिडीओतील या दिव्यांग खेळाडूचा खेळ पाहून तेंडुलकरही भावूक झाला आणि त्यांनी सर्वांना असेच काही प्रेरणादायी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन केले. 

सचिन तेंडुलकर शोधात असलेली 'ती' व्यक्ती सापडली; जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका व्यक्तीच्या शोधात असल्याचा व्हिडीओ अपलोड केला होता. त्यानं नेटीझन्सनाही त्या व्यक्तीला शोधण्यास मदत करण्याचे आवाहन केले होते. अखेर तेंडुलकर शोधात असलेली ती व्यक्ती सापडली. चेन्नईच्या ताज हॉटेलनं तेंडुलकरला ती व्यक्ती शोधून दिली. 
 

तेंडुलकरं काय आवाहन केलं होतं?
तेंडुलकर निवृत्त होऊन सहा वर्ष झाली, परंतु आजही त्याची जादू क्रिकेटप्रेमींच्या मनात कायम आहे. तेंडुलकरनं भारतीयांना क्रिकेटवर जीवापाड प्रेम करायला शिकवलं. त्यामुळेच आजही तेंडुलकरची ओळख 'क्रिकेटचा देव' म्हणून कायम आहे. तेंडुलकरच्या प्रत्येक हालचालींवर, प्रत्येक ट्विटवर साऱ्यांचे लक्ष असते. शनिवारी क्रिकेटच्या देवानं नेटीझन्सना साद घातली होती. तेंडुलकर कोणत्यातरी व्यक्तीच्या शोधात आहे आणि ती व्यक्ती शोधून देण्यासाठी तेंडुलकरनं नेटीझन्सकडे मदत मागितली आहे होती. 

कोण आहे ती व्यक्ती आणि तेंडुलकर का आहे तिच्या शोधात?
तेंडुलकरनं सांगितलं की,''मी एका हॉटेलमध्ये थांबलो होतो, तेव्हा मी कॉफीची ऑर्डर केली होती. तेव्हा एक वेटर कॉफी घेऊन रुममध्ये आला आणि त्यानं मला क्रिकेटविषयी बोलायचं आहे, तर बोलू का? असं विचारलं. तेव्हा मी होकार दिला. त्यानं मला सांगितलं की, सर जेव्हा तुम्ही आर्म गार्ड घालता तेव्हा तुमच्या बॅटीच्या रिफ्लेक्शनमध्ये बदल जाणवतो. यावर मी कधी जगात कोणाशी बोललो नव्हतो आणि ते केवळ मलाच माहित होतं. तो वेटर म्हणाला मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुमची फलंदाजी मी पुन्हा पुन्हा पाहतो. तेव्हा मला हे जाणवलं. त्याच्या या निरिक्षणावर मी होकार दिला. त्यानंतर मी माझं एलबो गार्डच्या डिझाईनमध्ये बदल करून घेतला आणि त्याचा मला खूप फायदा झाला.''
हॉटेल ताजनं तो व्हेटर शोधून काढला. गुरुप्रसाद असे त्या व्हेटरचं नाव आहे. 

Web Title: Sachin tendulkar is emotional about Ramakant Achrekar's death anniversary ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.