नवी दिल्ली : भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर लवकरच एका क्रिकेटपटूच्या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे. मास्टर ब्लास्टर तेंडुलर आणि श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन हे मैदानावर कट्टर प्रतिद्वंद्वी होते आणि मुथय्याच्या बयोपिकमध्ये आता तेंडुलकर दिसणार आहे.
मुरलीधरच्या जिवनावर '800' हा चित्रपट लवकरच येणार आहे आणि त्यात तेंडुलकरही दिसणार असल्याची घोषणा DAR मोशन पिक्चर्स प्रोडक्शन हेड सेतुमाघवन यांनी केली. त्यांनी सांगितले की,''तेंडुलकर हा जगातील सर्वोत्तम फलंदाज होता आणि मुथय्या हा सर्वोत्तम गोलंदाज. या दोघांची क्रिकेट कारकिर्दी सोबतच सुरू होती. त्यामुळे या चित्रपटात तेंडुलकर असणार आहे.''
तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक साजरा करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. दुसरीकडे सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुथय्या अव्वल स्थानी आहे. त्यानं कसोटीत 800 विकेट्स घेतल्या आहेत आणि म्हणून त्याच्या चित्रपटाचे नावही 800 असं ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मुथय्याच्या क्रिकेट कारकिर्दीवरच नव्हे तर संपूर्ण आयुष्यावर आधारीत असणार आहे.
त्याच्या या चित्रपटात अर्जुन रणतुंगा, अरविंद डिसिल्वा, रोशन महानामा, तिलकरत्ने, सनथ जयसूर्या, लसिथ मलिंगा, तेंडुलकर, रिकी पाँटिंग, पंच डॅरेल हेयरसह जगातील अनेक दिग्गज असणार आहेत.
Web Title: Sachin Tendulkar to feature in Muralitharan's biopic
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.