मुंबई : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या बाबतीत कोणतीही गोष्ट घडली तर ती लगेच वायरल होते. आता हेच उदाहरण घ्या, सचिनची कोर्टामध्ये एक केस सुरु आहे आणि १४ कोटी रुपयांचा दावा केला गेला आहे. हे वृत्त क्रिकेट जगतामध्ये वाऱ्यासारखे पसरले आहे.
सचिनने ऑस्ट्रेलियाच्या कंपनीबरोबर एक करार केला होता. हा करार भंग झाल्यामुळे सिडनीच्या कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये १४ कोटी रुपयांचा दावा करण्यात आलेला आहे.
ऑस्ट्रेलियातील स्पार्टन स्पोर्ट्स इंटरनॅशनल या कंपनीबरोबर सचिनने करार केला होता. हा करार २०१६ साली करण्यात आला होता. स्पार्टन स्पोर्ट्स इंटरनॅशनल ही कंपनी क्रिकेटच्या बॅट बनवण्याचे काम करते. त्याचबरोबर काही क्रिकेटची उपकरणंही बनवते. आपल्या कंपनीच्या बॅटवर सचिनचा फोटो आणि नाव असायला हवे, असे स्पार्टन स्पोर्ट्स इंटरनॅशनल वाटले. यानंतर त्यांनी सचिनशी हा करार केला. या करारानुसार स्पार्टन स्पोर्ट्स इंटरनॅशनल कंपनी दरवर्षी सचिनला सात कोटी रुपये देणार होती. पण स्पार्टन स्पोर्ट्स इंटरनॅशनल कंपनीने अजूनही सचिनला ठरलेली रक्कम दिलेली नाही. त्यामुळे सचिनने स्पार्टन स्पोर्ट्स इंटरनॅशनल या कंपनीविरोधात सिडनीच्या कोर्टात केस दाखल केली आहे. याबाबतचे वृत्त लोकमत न्यूज डॉट इन या हिंदी वेबसाईटने दिले आहे.
पाकचा सामना कसा कराल, 'विराट'सेनेसाठी तेंडुलकरचा मास्टर प्लान
पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द झाल्यानंतर सर्वांचे लक्ष रविवारच्या लढतीकडे लागले आहे. येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पक्के शेजारी अन् कट्टर वैरी समोरासमोर येणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत या प्रतिस्पर्धींचा सामना पाहण्याची संधी कोणीच दवडू इच्छित नाही. या महत्त्वाच्या सामन्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं भारतीय संघाला एक मास्टर प्लान दिला आहे.
रविवारच्या सामन्यात मोहम्मद आमीर आणि वाहब रियाज हे गोलंदाज भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरतील असे मत, 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या तेंडुलकरनं व्यक्त केले आहे. तो म्हणाला,''भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सर्वाधिक अनुभवी फलंदाज आहेत आणि पाकिस्तानने त्यांच्याविरोधात नक्की रणनीती तयार केली असेल. आमीर व रियाज हे दोघंही रोहित व विराटची विकेट घेण्यासाठी प्रयत्न करतील, परंतु त्याचवेळी रोहित व विराट त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असतील. माझा सल्ला असा आहे की अन्य खेळाडूंनी त्यांना साथ द्यावी.''
आमीरनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट घेत विक्रमी कामगिरी केली. तेंडुलकरनं आमीरच्या गोलंदाजीचे कौतुक केले. ''ऑस्ट्रेलियाविरुद्ध आमीरचा पहिला स्पेल अचूक होता. अॅरोन फिंचची त्यानं तारांबळ उडवली होती. त्याचा सामना करताना भारतीयांनी सकारात्मक दृष्टीकोनानं खेळावं. त्याच्याविरोधात काहीही वेगळं करण्याची गरज नाही. संयम बाळगा,'' असे तेंडुलकर म्हणाला.