मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतके लगावली आहेत. पण सचिनने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले होते, तेव्हा त्याला एक खास गिफ्ट मिळाले होते. हे गिफ्ट नेमके काय होते, तुम्हाला माहिती आहे का...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तब्बल पाच वर्षे सचिनला एकही शतक झळकावता आले नव्हते. अखेर ऑस्ट्रेलियामध्ये 9 सप्टेंबर 1994 साली सचिनचे पहिले एकदिवसीय शतक पाहायला मिळाले. सचिनने या सामन्यात आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 110 धावा केल्या केल्या. सचिनच्या 110 धावांच्या जोरावर भारताने 246 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आला नव्हता, त्यांचा डाव 215 धावांवर आटोपला आणि भारताने विजय मिळवला.
सचिन हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा शिल्पकार ठरला होता. कारण त्याच्या शतकाच्या जोरावर भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली होती आणि तिथपर्यंत ऑस्ट्रेलियाला पोहोचता आले नव्हते. त्यामुळे सचिनला या लढतीमध्ये खास गिफ्ट मिळाले आणि ते होते सामनावीर पुरस्काराचे. या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू हे पारितोषिक सचिनला मिळाले होते.
सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकांचा विश्वविक्रम कोण मोडू शकतो, शेन वॉर्नची भविष्यवाणी
भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे बरेच विश्वविक्रम आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतकांचा विश्वविक्रमही सचिनच्याच नावावर आहे. पण विश्वविक्रम मोडीत निघू शकतो, असे ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नला वाटते. याबाबतची भविष्यॉवाणीही वॉर्नने केली आहे. वॉर्नच्या मते क्रिकेट विश्वातील एक फलंदाज सचिनचा हा विक्रम मोडी काढू शकतो.
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतके झळकावली होती. यामध्ये 51 कसोटी आणि 49 एकदिवसीय शतकांचा समावेश आहे. एका खास मुलाखतीमध्ये वॉर्नला सचिनच्या शंभर शतकांच्या विक्रमाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी सचिनचा शंभर शतकांचा विक्रम मोडीत निघू शकतो, असे वॉर्न म्हणाला. वॉर्न फक्त एवढ्यावर थांबला नाही तर सचिनचा हा विश्वविक्रम कोण मोडीत काढणार हेदेखील त्याने यावेळी सांगितले.
वॉर्न यावेळी म्हणाला की, " सचिनने शंभर शतकांचा विश्वविक्रम रचला होता. पण हा विश्वविक्रम मोडीत निघू शकतो आणि तो विराट कोहली मोडीत काढून शकतो. कारण सध्या कोहलीच्या नावावर 68 शतके आहेत आणि तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे सचिनचा शंभर शतकांचा विश्वविक्रम कोहलीच मोडू शकतो."
Web Title: Sachin Tendulkar got this 'special' gift when he scored his first century in ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.