Join us  

सचिन तेंडुलकरला 'या' गोष्टीसाठी तब्बल पाच वर्षे वाट पाहावी लागली होती

बरेच विश्वविक्रम सचिनने आपल्या नावावर केले होते. पण फक्त एका गोष्टीसाठी सचिनला तब्बल पाच वर्षे वाट पाहावी लागली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 4:42 PM

Open in App

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एनेक मैलांचे दगड गाठले होते. धावांच्या राशी त्याने उभारल्या होत्या. क्रिकेट विश्वात कोणाला जमले नाही, ते महाशतक त्याने साकारले. बरेच विश्वविक्रम सचिनने आपल्या नावावर केले होते. पण फक्त एका गोष्टीसाठी सचिनला तब्बल पाच वर्षे वाट पाहावी लागली होती.

सचिनने पाकिस्तानविरुद्ध 1989 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षे सचिन एका गोष्टीची वाट पाहत होता. पण आजच्याच दिवशी 1994 साली सचिनला तब्बल पाच वर्षांनंतर एक गोष्ट मिळाली होती. त्यामुळे सचिन आजचा दिवस कधीही विसरू शकणार नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तब्बल पाच वर्षे सचिनला एकही शतक झळकावता आले नव्हते. अखेर ऑस्ट्रेलियामध्ये 9 सप्टेंबर 1994 साली सचिनचे पहिले एकदिवसीय शतक पाहायला मिळाले. सचिनने या सामन्यात आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 110 धावा केल्या केल्या. सचिनच्या 110 धावांच्या जोरावर भारताने 246 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आला नव्हता, त्यांचा डाव 215 धावांवर आटोपला आणि भारताने विजय मिळवला. सचिनला शतकी खेळीमुळे या लढतीत सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.

सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकांचा विश्वविक्रम कोण मोडू शकतो, शेन वॉर्नची भविष्यवाणीभारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे बरेच विश्वविक्रम आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतकांचा विश्वविक्रमही सचिनच्याच नावावर आहे. पण विश्वविक्रम मोडीत निघू शकतो, असे ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नला वाटते. याबाबतची भविष्यॉवाणीही वॉर्नने केली आहे. वॉर्नच्या मते क्रिकेट विश्वातील एक फलंदाज सचिनचा हा विक्रम मोडी काढू शकतो.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतके झळकावली होती. यामध्ये 51 कसोटी आणि 49 एकदिवसीय शतकांचा समावेश आहे. एका खास मुलाखतीमध्ये वॉर्नला सचिनच्या शंभर शतकांच्या विक्रमाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी सचिनचा शंभर शतकांचा विक्रम मोडीत निघू शकतो, असे वॉर्न म्हणाला. वॉर्न फक्त एवढ्यावर थांबला नाही तर सचिनचा हा विश्वविक्रम कोण मोडीत काढणार हेदेखील त्याने यावेळी सांगितले.

वॉर्न यावेळी म्हणाला की, " सचिनने शंभर शतकांचा विश्वविक्रम रचला होता. पण हा विश्वविक्रम मोडीत निघू शकतो आणि तो विराट कोहली मोडीत काढून शकतो. कारण सध्या कोहलीच्या नावावर 68 शतके आहेत आणि तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे सचिनचा शंभर शतकांचा विश्वविक्रम कोहलीच मोडू शकतो."

टॅग्स :सचिन तेंडुलकरआॅस्ट्रेलिया