सचिन तेंडुलकर बनला सर्वोत्तम क्रीडाक्षणाचा मानकरी

लारेस पुरस्कार : भारतीयांच्या ‘लॅप आॅफ आॅनर’चा गौरव, दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी संघाचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 06:33 AM2020-02-19T06:33:36+5:302020-02-19T06:34:10+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar has become the best sports standard | सचिन तेंडुलकर बनला सर्वोत्तम क्रीडाक्षणाचा मानकरी

सचिन तेंडुलकर बनला सर्वोत्तम क्रीडाक्षणाचा मानकरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बर्लिन : महान फलंदाज सचिन तेंडुलकरची २००० ते २०२० पर्यंत लारेस सर्वोत्तम क्रीडा क्षण पुरस्कारासाठी निवड झाली. भारतीय प्रशंसकांच्या समर्थनामुळे तेंडुलकरला या पुरस्कारासाठी सर्वाधिक मते मिळाली. भारताच्या २०११ विश्वकप विजेतेपदाबाबत तेंडुलकरसंबंधीतच्या क्षणाला ‘कॅरिड आॅन शोल्डर आॅफ ए नेशन’ शीर्षक देण्यात आले होते. महान टेनिसपटू बॉरिस बेकरने या पुरस्काराची घोषणा केली. त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह वॉने तेंडुलकरला ट्रॉफी प्रदान करीत सन्मानित केले.
विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघातील सदस्यांनी तेंडुलकरला खांद्यावर उचलून घेत मैदानावर ‘लॅप आॅफ आॅनर’ लगावला.

यावेळी या दिग्गज फलंदाजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. पुरस्कारासाठी असलेल्या यादीमध्ये सुरुवातीला २० दावेदारांचा समावेश करण्यात आला होता, पण व्होटिंगनंतर केवळ पाच दावेदारांना या यादीत स्थान मिळाले आणि त्यात तेंडुलकर विजेता ठरला.
ट्रॉफी स्वीकारल्यानंतर तेंडुलकर म्हणाला, ‘हा शानदार क्षण आहे. विश्वकप जिंकण्याची भावना शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. कुठल्या प्रतिक्रियेसाठी लोकांची भावना मिळतीजुळती न होणे, असे कितीदा घडते. पूर्ण देश जल्लोष करीत आहे, असे फार कमी वेळा घडते.’
भारतीय दिग्गज सचिन पुढे म्हणाला, ‘जीवनात बदल घडवून आणण्याचे खेळ किती सशक्त माध्यम आहे, याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली. मला आताही तो क्षण आठवला की तसेच वाटते.’

ट्रॉफी स्वीकारल्यानंतर सचिन म्हणाला, ‘माझ्या प्रवासाची (क्रिकेट) सुरुवात मी १० वर्षांचा असल्यापासून झाली.भारताने पहिला विश्वकप जिंकला. त्यावेळी मला त्याचे महत्त्व कळत नव्हते. कारण प्रत्येक जण जल्लोष करीत होता आणि त्यात मीसुद्धा सहभागी झालो होतो. मीसुद्धा एक दिवस याचा अनुभव घेण्यास इच्छुक होतो... आणि येथूनच माझ्या प्रवासाची सुरुवात झाली.’ वन-डे व कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीतील अनेक विक्रम आपल्या नावावर करणारा हा खेळाडू म्हणाला, ‘हा (विश्वकप जिंकणे) माझ्या जीवनातील सर्वांत गौरवपूर्ण क्षण होता. मी २२ वर्षे याचा पाठलाग केला, पण हिंमत कधीच सोडली नाही. मी केवळ माझ्या देशातर्फे ट्रॉफी स्वीकारत होतो.’
लारेस ट्रॉफी स्वीकारणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, असेही सचिन म्हणाला. यावेळी सचिनने दक्षिण आफ्रिकेचे कांतिकारी नेते नेल्सन मंडेला यांच्या प्रभावाबाबत सांगितले. तेंडुलकरने ज्यावेळी मंडेला यांची भेट घेतली त्यावेळी सचिनचे वय केवळ १९ वर्षांचे होते.
सचिन म्हणाला, ‘अडचणींमुळे त्यांच्या नेतृत्वाला प्रभावित केले नाही. त्यांनी दिलेल्या अनेक संदेशांमध्ये मला सर्वात महत्त्वाचे हे वाटले की, खेळामध्ये सर्वांना एकत्र करण्याची शक्ती आहे.’ कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा सचिनचे या पुरस्कारासाठी अभिनंदन केले. विराटने तेंडुलकर व बीसीसीआयला टॅग करताना टिष्ट्वट केले, ‘प्रतिष्ठेचा लारेस सर्वोत्तम क्रीडा क्षण पुरस्कार जिंकण्यासाठी सचिन पाजीचे अभिनंदन. आमच्या देशासाठी एक मोठा सन्मान व अभिमानाचा क्षण.’

मेस्सी, हॅमिल्टन सर्वोत्कृष्ट खेळाडू
ब्रिटिश फॉर्म्युला वन खेळाडू लुई हॅमिल्टन व स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी यांना सर्वोत्कृष्ठ खेळाडूंचा पुरस्कार देण्यात आला. अमेरिकेची जिमनॅस्टिकपटू सिमोन बाईल्सने तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ठ महिला खेळाडूचा पुरस्कार मिळवला. जागतिक अ‍ॅक्शन क्रीडा पुरस्कारासाठी स्नो बोर्ड खेळाडू क्लो किमची निवड करण्यात आली. २०१९ मध्ये जागतिक रग्बी स्पर्धेचे जेतेपद पटकावणाºया दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सर्वोत्कृष्ठ संघाचा पुरस्कार देण्यात आला.
 

Web Title: Sachin Tendulkar has become the best sports standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.