Join us  

आयसीसीने सुपर ओव्हरचा नियम बदलला, त्यावर सचिन तेंडुलकर म्हणाला...

या नियमाच्या बदलावर आता भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रीया दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 5:38 PM

Open in App

मुंबई : आयसीसीने नुकताच सुपर ओव्हरच्या नियमामध्ये बदल केला. हा नियम जर यापूर्वीच बदलला असता तर यंदाच्या विश्वचषक न्यूझीलंड जिंकू शकला असता, अशी प्रतिक्रीया बऱ्याच चाहत्यांनी दिली. पण उशिरा का होईना या नियमामध्ये आयसीसीने बदल केला. या नियमाच्या बदलावर आता भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रीया दिली आहे.

आयसीसीचा नवा नियम काय सांगतोजर एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. ही सुपर ओव्हरही टाय झाली तर पुन्हा ती खेळवण्यात येईल. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल.

सचिन नेमकं काय म्हणाला...आयसीसीच्या नवीन नियमाबद्दल सचिनने आपले मत व्यक्त केले आहे. सचिन म्हणाला की, " आयसीसीने सुपर ओव्हरबद्दल घेतलेला निर्णय हा फार महत्वाचा आहे. कारण जर एखादा सामना अटीतटीचा होत असेल तर त्याचा निर्णय योग्यपद्धतीने लागायला हवा. माझ्यामध्ये आयसीसीचा हा योग्य निर्णय आहे."

 यंदाच्या विश्वचषकाची अंतिम फेरी सुपर ओव्हरमुळे चांगलीच चर्चेत आली होती. न्यूझीलंडने या सामन्यात दर्जेदार खेळ केला, पण फक्त एका नियमामुळे न्यूझीलंडला विश्वचषक गमवावा लागला आणि इंग्लंडने जेतेपद पटकावले. आता नियम आयसीसीने बदलला आहे.

यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरही टाय झाली होती. यावेळी चौकार आणि षटकारांच्या जोरावर इंग्लंडला जेतेपद देण्यात आले होते. या आयसीसीच्या नियमावर चाहत्यांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळेच आता आयसीसीने या नियमामध्ये बदल केला आहे.

टॅग्स :सचिन तेंडुलकरआयसीसी