Join us  

सचिन तेंडुलकरनं राज्यसभेत हजेरी लावली, आणि सोशल मीडियावर झाला ट्रोल 

सचिन बऱ्याच दिवसांनी राज्यसभेत हजर होता. प्रश्नोत्तरांच्या तासात तो काही बोलला नाही, पण त्याच्या उपस्थितीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 8:59 PM

Open in App

नवी दिल्ली, दि. 3 - राज्यसभा खासदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या संसदेतील गैरहजरेची मुद्दा दोन दिवसांपूर्वी उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आज सचिन तेंडुलकरने राज्यसभेच्या सभागृहात हजेरी लावली. सचिन बऱ्याच दिवसांनी राज्यसभेत हजर होता. प्रश्नोत्तरांच्या तासात तो काही बोलला नाही, पण त्याच्या उपस्थितीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंपरंतु यामुळे सचिनला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. मंगळवारी समाजवादी पार्टीचे एमपी नरेश अग्रवाल यांनी सचिनच्या अनुपस्तितीचा मुद्दा उचलून धरला होता. त्याचीच रिऍक्शन म्हणून की काय, सचिन लगेचच गुरुवारी राज्यसभेत दिसला. जर त्यांना संसदेत यायला जमणार नसेल तर त्यानी राजीनामा द्यावा असे अग्रवाल म्हणाले होते. सचिन तेंडुलकर आणि सिने अभिनेत्री रेखा यांची राज्यसभेत सर्वात कमी उपस्थिती आहे.हाच धागा पकडून मास्टर ब्लास्टरला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले. काय म्हणाले नेटीझन्स तुम्हाच वाचा...सचिन तेंडुलकरनं राज्यसभेत हजर लावली, आणि सोशल मीडियावर झाला ट्रोल नवी दिल्ली, दि. 3 - राज्यसभा खासदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या संसदेतील गैरहजरेची मुद्दा दोन दिवसांपूर्वी उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आज सचिन तेंडुलकरने राज्यसभेच्या सभागृहात हजेरी लावली. सचिन बऱ्याच दिवसांनी राज्यसभेत हजर होता. प्रश्नोत्तरांच्या तासात तो काही बोलला नाही, पण त्याच्या उपस्थितीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंपरंतु यामुळे सचिनला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. मंगळवारी समाजवादी पार्टीचे एमपी नरेश अग्रवाल यांनी सचिनच्या अनुपस्तितीचा मुद्दा उचलून धरला होता. त्याचीच रिऍक्शन म्हणून की काय, सचिन लगेचच गुरुवारी राज्यसभेत दिसला. जर त्यांना संसदेत यायला जमणार नसेल तर त्यानी राजीनामा द्यावा असे अग्रवाल म्हणाले होते. सचिन तेंडुलकर आणि सिने अभिनेत्री रेखा यांची राज्यसभेत सर्वात कमी उपस्थिती आहे.हाच धागा पकडून मास्टर ब्लास्टरला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले. काय म्हणाले नेटीझन्स तुम्हाच वाचा...