Join us  

सचिन तेंडुलकरचा सुपर संडे... मिसळ पाववर मारतोय ताव; पाहा Video

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मिसळ पावचा आनंद घेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 4:05 PM

Open in App

मुंबई : रविवार हा प्रत्येकासाठी खास दिवस असतो... तो सुट्टीचा दिवस असतो, त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या घरात आनंद लुटायचा असतो. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही आपला रविवार खास पद्धतीने साजरा करत मिसळ पाववर ताव मारला. सचिन तेंडुलकरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मिसळ पावचा आनंद घेत आहे.

रविवार असो किंवा सोमवार, मी कोणत्याही दिवशी मिसळ पाव घ्यायला तयार आहे, असे सचिन तेंडुलकरने इंस्टाग्रामवर लिहिले आहे. तसेच, सचिन तेंडुलकरने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, मिसळ पावची बातच वेगळी आहे. महाराष्ट्राची मिसळ पाव एक नंबर आहे. सचिन तेंडुलकरच्या या व्हिडिओला अनेकांनी लाइक्स केले आहे. 

दरम्यान, सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन अनेक उपक्रमात दिसतो. तो खवय्या असून त्याला विविध पदार्थांची चव चाखायला आवडते. यापूर्वीही सचिन तेंडुलकरने अनेकवेळा स्वयंपाकघरात आपला हात आजमावला होता. यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावरही शेअर केले होते.

सचिन तेंडुलकर त्याच्या इन्स्टाग्रामवर सतत असे व्हिडिओ शेअर करत असतो. इंस्टाग्रामवर सचिन तेंडुलकरचे 32.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. भारताचा क्रिकेटचा सर्वात मोठा सुपरस्टार सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बराच काळ लोटला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या 24 वर्षांच्या कारकीर्दीत 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 34 हजाराहून अधिक धावा केल्या. कसोटीत सचिन तेंडुलकरने 51 शतकांसह 15921 तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकांसह 18426 धावा केल्या आहेत.  

टॅग्स :सचिन तेंडुलकरइन्स्टाग्रामसोशल मीडिया
Open in App