क्रिकेटचा देव! सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप २०२३चा जागतिक राजदूत, ICCची घोषणा

सचिन तेंडुलकरला वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी जागतिक राजदूत ( Global Ambassador ) म्हणून घोषित केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 08:05 PM2023-10-03T20:05:47+5:302023-10-03T20:05:59+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar named ICC Global Ambassador for Men’s Cricket World Cup 2023 | क्रिकेटचा देव! सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप २०२३चा जागतिक राजदूत, ICCची घोषणा

क्रिकेटचा देव! सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप २०२३चा जागतिक राजदूत, ICCची घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारताचा महान खेळाडू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरलावन डे वर्ल्ड कप २०२३ साठी जागतिक राजदूत ( Global Ambassador ) म्हणून घोषित केले आहे. वन डे क्रिकेट स्पर्धेतील शिखर स्पर्धा सुरू होण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील उद्घाटन सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप ट्रॉफीसह येईल आणि स्पर्धेच्या उद्घाटनाची घोषणा करेल.  


सचिन तेंडुलकर म्हणाला: "१९८७ मध्ये बॉल बॉयसून ते सहा वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत, वर्ल्ड कपने माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान ठेवले आहे. २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकणे हा माझ्या क्रिकेट प्रवासातील सर्वात अभिमानास्पद क्षण आहे. आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये भारतामध्ये अनेक संघ आणि खेळाडू जोरदार स्पर्धा करण्यासाठी सज्ज असल्याने, मी या विलक्षण स्पर्धेची उत्सुकतेने वाट पाहत आहे. विश्वचषक स्पर्धेसारख्या मार्की इव्हेंट्सची स्वप्ने तरुणांच्या मनात आहेत, मला आशा आहे की ही आवृत्ती तरुण मुली आणि मुलांनाही खेळण्यास आणि त्यांच्या देशांचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करण्यास प्रेरित करेल.”


वर्ल्ड कप स्पर्धेतील आयसीसीचे राजदूत - वेस्ट इंडिजचे दिग्गज व्हिव्हियन रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स, इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन, ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिंच, श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन, न्यूझीलंडचा दिग्गज रॉस टेलर, भारताचा सुरेश रैना आणि माजी कर्णधार मिताली राज आणि पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद हाफीज या खेळाडूंचाही समावेश असेल.
  
 

Web Title: Sachin Tendulkar named ICC Global Ambassador for Men’s Cricket World Cup 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.