भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहतो. रोज एखादा तरी व्हिडीओ किंवा ट्विट तो सोशल मीडियावर करत असतो. बुधवारी त्यानं ट्विटरवर असाच एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात त्यानं क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरकडे अजब मागणी केली. त्यानं तेंडुलकरकडे 2-3 लिंबू मागितले.
Shocking : WWE सुपरस्टारचा बुडून दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवण्यासाठी केला त्याग!
भज्जीनं बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्या व्हिडीओमध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकर बांबूच्या सहाय्यानं झाडावरील लिंबू पाडताना दिसत आहे. 29 सेकंदाच्या या व्हिडीओत एक व्यक्ती चुकून लिंबूला आंबा म्हणतो त्यावर सचिन, अरे हा आंबा नाही लिंबू आहे, असे उत्तर देत आहे. हा व्हिडीओ शेअर करून भज्जीनं क्रिकेटच्या देवाकडे 2-3 लिंबू माझ्यासाठीपण असं ट्विट केलं.
पाहा व्हिडीओ...
India Today शी बोलताना भज्जी म्हणाला की,''पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीका खपवून घेतली जाणार नाही. तो समाजकार्य करत होता आणि माणूसकी म्हणून मी व युवीनं त्याला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. पण, आफ्रिदी आमच्या देशाला आणि पंतप्रधानांना नाव ठेवत असेल, तर ते खपवून घेतलं जाणार नाही. यापुढे आफ्रिदीसोबत मैत्री ठेवणार नाही. त्यानं त्याची मर्यादा ओलांडू नये, अन्यथा त्याची लायकी दाखवून देऊ.''