नवी दिल्ली : भारताच्या हवाई दलाने पोखरण येथे युद्धसराव करण्यात आला. या युद्धसरावाला भारताचा संसदपटू आणि माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर उपस्थित होता. याबाबतची माहिती दस्तुरखुद्द सचिनने आपल्या ट्विटरवरून दिली आहे.
सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " हवाई दलासह असणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या वीरांबरोबर उपस्थित राहणे, हा माझा सन्मान आहे. कारण ते आपल्या देशाचे संरक्षक आहे. शत्रूंपासून ते आपले संरक्षण करतात आणि त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित जगू शकत आहोत."
हे पाहा सचिनचे ट्विट
पुलवामा हल्ल्याच्या दोन दिवसानंतरच आज भारतीय हवाई दलानं भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील जैसलमेरच्या पोखरणमध्ये युद्धसराव केला. पोखरण रेंजमध्ये करण्यात आलेल्या हा भारतीय हवाई दलाचा देशातील सर्वात मोठा युद्धाभ्यास आहे. या युद्धाभ्यासात 130 लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर, अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरचा समावेश होता. वायुशक्ती 2019या कार्यक्रमांतर्गत हे शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. सरकारचे आदेशाचं पालन करत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचं हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी सांगितलं आहे.
हवाई दल कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचंही हवाई दलप्रमुख म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या युद्धसरावादरम्यान क्रिकेटचा सचिन तेंडुलकरही तिथे उपस्थित होता. हवेतून जमिनीपर्यंत मारा करणाऱ्या विमानांची ताकद यावेळी निदर्शनास आली. या युद्धाभ्यासात सुखोई-30, मिग-29, मिराज-2000, जग्वार, मिग-27 सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांचा समावेश होता. तसेच स्वदेशी बनावटीचं तेजस आणि अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेलं रुद्र या हेलिकॉप्टरनंही हवेत गोळीबार करून शक्तिप्रदर्शन केलं.
सिक्युरिटी द नेशन इन पीस अँड वॉर थीम
हवाई दलाचा हा कार्यक्रम दर तीन वर्षांनी आयोजित केला जातो. यावेळी हवाई दलानं 'वायु शक्ती 2019' या कार्यक्रमांतर्गत युद्धसराव केला आहे. यावेळी हवाई दलानं मिग -21 बायसन, मिग-27 यूपीजी, मिग- 29, जग्वार, एलसीए(तेजस), मिराज-2000, सू-30 एमकेआई, हॉक, सी-130 जे सुपर हर्क्युलस, एन-32, एमआय-17वी5, एमआय-35नं सरावात सहभाग घेतला. स्वदेशी बनावटीचं AEW & C आणि उन्नत लाइट हेलिकॉप्टर (ALH MK-IV)विमानांनी युद्धसराव केला आहे.
Web Title: Sachin Tendulkar present on the battle practice of Indian air force
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.