कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) नुकतेच चार महत्त्वाच्या नियमांना मंजूरी दिली आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे चेंडू चमकावण्यासाठी थुंकी किंवा घामाच्या वापरावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये स्थानिक अंपायर्सना संधी देण्यात येणार आहे. त्यावरून महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगा याची फिरकी घेतली. मलिंगाला त्याची सवय सोडावी लागण्याचा सल्ला देताना, तेंडुलकरनं त्याचं मतही मागितलं आहे.
मलिंगा गोलंदाजीसाठी धावायला सुरुवात करण्यापूर्वी चेंडूला किस करतो आणि आता त्याला ही सवय सोडावी लागणार आहे. त्यावरून सचिननं ट्विट केलं की,''आयसीसीच्या नव्या नियमानंतर कोणालातरी त्याची नेहमीची सवय मोडावी लागेल. तू काय सांगतोस मली?
- कोरोना व्हायरसचा बदली खेळाडू - कसोटी सामन्यात एखाद्या खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यास त्याच्या जागी आता संघाला बदली खेळाडू खेळवता येईल. बदली खेळाडूला सामनाधिकारी मंजूरी देतील. पण, हा नियम वन डे आणि ट्वेंटी-20 सामन्यांसाठी लागू नसेल.
- थुंकी किंवा घामाच्या वापरावर बंदी - चेंडू चमकावण्यासाठी थुंकी किंवा घामाचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. चेंडूबाबतचा निर्णय पंच घेतील. नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास खेळाडूंना वॉर्निंग दिली जाईल. दोन वेळा वॉर्निंग देऊनही खेळाडूंनी न ऐकल्यास संघाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येत पाच धावा जोडल्या जातील.
- तटस्थ पंच नसेल - कोरोना व्हायरसमुळे आलेल्या बंधनामुळे सध्यातरी स्थानिक पंचांची सामन्यासाठी नियुक्ती केली जाईल.
- अतिरिक्त DRS - प्रत्येक संघाला प्रत्येक डावासाठी अतिरिक्त DRS दिला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात प्रती डावासाठी तीन,तर मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी दोन DRS घेता येणार आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आयला सचिन... मास्टर ब्लास्टरच्या डुप्लिकेटनं गमावली नोकरी; झालीय कोरोनाची लागण
खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, तरीही IPL 2020 होऊ न देण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील; आखला खास प्लान
पाकिस्तानचे 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं विचारले दोन खोचक प्रश्न!
सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज!
भावांनो कोरोनाला लेचापेचा समजू नका; 10 क्रिकेटपटू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शाहिद आफ्रिदीचे आवाहन
गोलमाल है भाई...! काल कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला पाकिस्तानचा खेळाडू आज झाला निगेटिव्ह
नताशाच्या प्रेमात हार्दिक पांड्या बनला 'बावर्ची'; बनवली स्पेशल डिश