Join us  

टीम इंडियातील दोघांना 'शाब्बासकी'! सचिन तेंडुलकरनं बाकीच्या मंडळींचे टोचले कान

टीम इंडियाच्या न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर मास्टर सचिन तेंडुलकरनं दोन खेळाडू सोडून अन्य मंडळींची शाळा घेतल्याचे दिसते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2024 7:01 PM

Open in App

Sachin Tendulkar Questions Indian Team Defeat vs New Zealand : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं मुंबईच्या वानखेडे स्टेडियवरील अखेरचा कसोटी सामनाही गमावला. या पराभवामुळे पहिल्यांदाच भारतीय संघावर घरच्या मैदानात व्हाइट वॉशची नामुष्की ओढावली. टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यात क्रिकेटचा देव आणि  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. त्याने  दोघांना शाब्बासकी देत बाकीच्या मंडळींसंदर्भात तिखट प्रतिक्रिया दिली आहे. 

शॉट सिलेक्शनची कमी तयारीचा अभाव, नेमकं काय म्हणला तेंडुलकर?   

टीम इंडियाच्या न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर मास्टर सचिन तेंडुलकरनं दोन खेळाडू सोडून अन्य मंडळींची शाळा घेतल्याचे दिसते. भारतीय संघाच्या खराब कामगिरीवर त्याने एक नाही तर अनेक प्रश्न उपस्थिती केले आहेत. सचिन तेंडुलकरन एक्सवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, घरच्या मैदानात ३-० असा पराभव पचवणे खूपच कठिणआहे. याची कारण शोधली पाहिजेत. तयारी कमी पडली?  शॉट सिलेक्शन योग्य नव्हते? की, मॅच प्रॅक्टिसचा अभाव? असे प्रश्न त्याने उपस्थितीत केले आहेत. 

दोघांना शाब्बासकी; न्यूझीलंडच्या तौफ्यावरही कौतुकाचा वर्षाव

शुबमन गिलनं पहिल्या डावात मैदानात तग धरून चांगली कामगिरी करून दाखवली. रिषभ पंत दोन्ही डावात उत्तम खेळला. दोघांनी  फुटवर्कच्या जोरावर कठिण परिस्थितीत इतरांपेक्षा चांगला खेळ दाखवला, असा उल्लेख करत तेंडुलकरनं या दोन युवा बॅटरचं कौतुक केले आहे. याशिवाय न्यूझीलंडनं मालिकेत सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी केली भारतीय मैदानात ३-० विजय त्यामुळेच शक्य झाला. यापेक्षा उत्तम काहीच अशू शकत नाही, अशा शब्दांत त्याने न्यूझीलंड संघाचेही तोंडभरून कौतुक केल्याचे दिसते. 

पंत एकटा नडला, पण ....

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघासमोर विजयासाठी १४७ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १२१ धावांत आटोपला. टीम इंडियातील ८ खेळाडूंना दुहेरी आक़डाही काढता आला नाही. रिषभ पंत एकटा नडला. त्याने दमदार फिफ्टी करत संघाच्या विजयाची आसही वाढवली होती. पण त्याची विकेट पडली अन् हा सामना न्यूझीलंडच्या बाजूनं झुकला. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघन्यूझीलंडसचिन तेंडुलकररोहित शर्माविराट कोहलीरिषभ पंतशुभमन गिल