मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या चार क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमध्ये किती शतके लगावली यानुसार त्यांचा क्रम ठरवला, असा प्रश्न कौन बनेगा करोडपती, या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. पाहा किती जणांनी दिले योग्य उत्तर...
ज्या खेळाडूची कमी शतके आहेत त्याच्यापासून सुरुवात करून ज्याची जास्त शतके आहेत, तोपर्यंत हा चढता क्रम लावावा, असे सांगण्यात आले होते. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट यामध्ये हा प्रश्न दहा स्पर्धकांना विचारण्यात आला होता. यावेळी स्पर्धक चांगलेच गांगरलेले पाहायला मिळाले होते. या प्रश्नांवर फक्त तीन जणांनाच योग्य उत्तर देता आले होते.
केबीसीचे अँकर अमिताभ बच्चन यांनी हा प्रश्न विचारला आणि त्याला पुढीलप्रमाणे पर्याय दिले होते. १. सचिन तेंडुलकर, २. चेतेश्वर पुजारा, ३. विराट कोहली आणि ४, राहुल द्रविड.
कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराने १८ शतके झळकावली आहेत, त्यामुळे तो पहिल्या क्रमांकावर होता. कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये २६ शतके पूर्ण केली आहेत, तर द्रविडने ३६ शतके झळकावली होती. त्यामुळे कोहली दुसऱ्या आणि द्रविड तिसऱ्या क्रमांकावर आले आणि सचिनच्या नावावर ५१ शतके आहेत त्यामुळे तो चौथ्या क्रमांकावर होता.