Sachin Tendulkarसाठी कन्येनं बनवली स्पेशल डिश; 60 सेकंदात फस्त

खेळाडू कुटुंबीयांसोबत घरच्या कामात मदत करताना पाहायला मिळल आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 11:22 AM2020-05-07T11:22:27+5:302020-05-07T11:24:15+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar Relishes Beetroot Kebabs By Daughter Sara, Finishes In '60 Seconds' svg | Sachin Tendulkarसाठी कन्येनं बनवली स्पेशल डिश; 60 सेकंदात फस्त

Sachin Tendulkarसाठी कन्येनं बनवली स्पेशल डिश; 60 सेकंदात फस्त

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लॉकडाऊनमुळे सर्वांना घरीच रहावे लागत आहे. त्यामुळे खेळाडू कुटुंबीयांसोबत घरच्या कामात मदत करताना पाहायला मिळल आहेत. सचिन तेंडुलकरही त्याला अपवाद नाही. तोही स्वयंपाक करणे, झाडांना पाणी घालण्याचं काम करताना दिसत आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं गुरुवारी कन्या सारासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत सारानं एक स्पेशल डिश बनवली आहे आणि तेंडुलकरनं ती 60 सेकंदात फस्त केली. 

इंस्टाग्रामवर तेंडुलकरचे 21.7 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि सचिननं 60 सेकंदात ही डिश कशी फस्त केली, असा प्रश्न त्यांना पडला. तेंडुलकरनं एकट्यानं नव्हे, तर सारानंही त्याला मदत केली. सारानं ही डिश बनवली असल्यानं तेंडुलकरनं कौतुक केलं आहे.  


 
सचिनने सुचवला कसोटी चॅम्पियनशिपसाठी तोडगा
अधांतरी असलेली कसोटी चॅम्पियनशिप पूर्ण करण्याचा उपाय मास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने सुचवला आहे. चॅम्पियनशिप पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेकडून शिकण्यासारखे आहे, असे सचिन म्हणाला. आयओसीने कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन वर्षभरासाठी लांबणीवर टाकले.

सचिनच्या मते, ‘कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठी खरे आव्हान कसोटी क्रिकेट आहे. लॉकडाऊनमुळे सध्या सर्वच क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या. अशावेळी विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना २०२१ ला लॉर्डसवर खेळविण्यास हरकत नाही. चॅम्पियनशिपचे पहिले सत्र निर्विघ्वनपणे पार पाडायचे झाल्यास आयओसीच्या पावलांवर पाऊल टाकायला हवे.’

सचिनने चॅम्पियनशिपचे नव्याने आयोजन करण्याची सूचना मूर्खपणाची असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘पुन्हा सुरू करण्यापेक्षा एकदा सुरू झालेली स्पर्धा पारदर्शी पद्धतीने सुरू राहावी, सर्वांना संधी मिळावी या हेतूने उर्वरित सामने आटोपण्यात यावेत. स्पर्धेची कालमर्यादा वाढविणे शक्य आहे. टोकियो ऑलिम्पिक लांबणीवर टाकण्यात आली तरी २०२१ ला ‘टोकियो ऑलिम्पिक २०२०’ असेच संबोधले जाणार आहे. आयसीसीनेदेखील हाच कित्ता गिरवण्यास हरकत नाही.’ 

 

Mohammed Shamiचं नाव का बदनाम करतेस? हसीन जहाँच्या नव्या व्हिडीओवर नेटिझन्स संतापले  

रोहित शर्मानं दिली Good News; मोठ्या आनंदात केलं नव्या पाहुण्याचं स्वागत

Web Title: Sachin Tendulkar Relishes Beetroot Kebabs By Daughter Sara, Finishes In '60 Seconds' svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.