Join us  

सचिन तेंडुलकर म्हणतो, मी डावखुरा असलो तरी नेहमीच उजवा ठरलो

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा डावखुरा खेळाडू नव्हता. तो फलंदाजी आणि गोलंदाजीही उजव्या हातानेच करायचा.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 4:19 PM

Open in App
ठळक मुद्देआजच्या 'वर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे' सचिनने एक व्हीडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

मुंबई : हे वरील शिर्षक ऐकून तुम्ही चक्रावला असाल. कारण भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा डावखुरा खेळाडू नव्हता. तो फलंदाजी आणि गोलंदाजीही उजव्या हातानेच करायचा. पण लिहीताना मात्र सचिन डाव्या हाताचा वापर करतो. आजच्या 'वर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे' सचिनने एक व्हीडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सचिन डाव्या हाताने हस्ताक्षर करताना दिसत आहे. त्या व्हीडिओवर सचिनने लिहिले आहे की, " मी डावखुरा आहे, पण नेहमीच उजवा राहिलो आहे. "

पाहा सचिनचे हे ट्विट

सचिननंतर त्याचा मित्र विनोद कांबळीनेही ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. कांबळी हा डावखुरा फलंदाज होता. भारताकडून खेळताना त्याने जलद हजार धावा करण्याचा विक्रम केला होता.

विनोद कांबळीने केलेले ट्विट

टॅग्स :सचिन तेंडुलकरविनोद कांबळीक्रिकेट