Sachin Tendulkar Video: 'मुंबईकर' सचिन तेंडुलकर रमला BEST बस नंबर ३१५च्या आठवणीत; आवडत्या सीटबद्दलही भरभरून बोलला

सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 03:18 PM2022-04-09T15:18:08+5:302022-04-09T15:19:15+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar shares an emotional video of him in BEST bus number 315 mumbai bandra to shivaji park | Sachin Tendulkar Video: 'मुंबईकर' सचिन तेंडुलकर रमला BEST बस नंबर ३१५च्या आठवणीत; आवडत्या सीटबद्दलही भरभरून बोलला

Sachin Tendulkar Video: 'मुंबईकर' सचिन तेंडुलकर रमला BEST बस नंबर ३१५च्या आठवणीत; आवडत्या सीटबद्दलही भरभरून बोलला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sachin Tendulkar Video: जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकरमुंबईतील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसला. काही दिवसांपूर्वी सचिनने बेस्ट (BEST bus) बसमधील प्रवासाची आठवण करून देत त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता त्या क्षणांची आठवण करून देणारा एक व्हिडिओही त्याने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मुंबईकरसचिन तेंडुलकरने त्याचे बालपणीचे दिवस आठवले.

BEST बस क्रमांक ३१५ बद्दल बोलताना सचिन खूप भावूक झाल्याचं दिसत होता. सचिनने सांगितले की, तो या क्रमांकाच्या बसमधून त्याच्या घरापासून वांद्रे ते शिवाजी पार्क असा प्रवास करत असे. क्रिकेटच्या सरावासाठी सचिन या क्रमांकाच्या बसने प्रवास करायचा. यासोबतच इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सचिनने त्याच्या आवडत्या सीटचाही उल्लेख केला. सचिनने सांगितले की, तो अनेकदा मागच्या सीटच्या खिडकीत बसायचा.

यासोबतच सचिनने गमतीत सांगितले की, कधी-कधी तो त्या सीटवर बसला की वाऱ्यामुळे त्याला छान झोप लागायची. अनेक वेळा तो त्याचा स्टॉपही विसरून पुढे निघून जायचा. आपल्या बालपणीच्या दिवसांची आठवण करून देताना तो म्हणाला की या सर्व गोष्टी त्याला आनंद देतात. सचिन तेंडुलकरने आपल्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीला अगदी लहान वयात सुरुवात केली. सचिनने १९८८ साली वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

सचिन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याच्या एका वर्षानंतर १९८९ मध्ये पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सचिन २०१३ पर्यंत सलग २४ वर्षे भारतीय संघाकडून क्रिकेट खेळला. त्याने भारतासाठी २०० कसोटी, ४६३ एकदिवसीय आणि एक टी२० सामना खेळला. सचिन हा जागतिक क्रिकेटमध्ये एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

 

Read in English

Web Title: Sachin Tendulkar shares an emotional video of him in BEST bus number 315 mumbai bandra to shivaji park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.