सचिनच्या निरोपाच्या भाषणात आचरेकर सरांचं नाव आलं, अन्

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घडवण्यात रमाकांत आचरेकर सरांचा फार महत्त्वाचा वाटा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 07:39 PM2019-01-02T19:39:02+5:302019-01-02T19:39:19+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar speechless when he took name of Ramakant Acharekar sir in his last match | सचिनच्या निरोपाच्या भाषणात आचरेकर सरांचं नाव आलं, अन्

सचिनच्या निरोपाच्या भाषणात आचरेकर सरांचं नाव आलं, अन्

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : आज आपण ज्याला क्रिकेटचा देव म्हणून संबोधतो, क्रिकेट चाहते ज्याची पूजा करतात, युवा खेळाडू ज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटकडे वळले त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घडवण्यात रमाकांत आचरेकर सरांचा फार महत्त्वाचा वाटा होता. त्या आचरेकरांचे सरांचे बुधवारी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. 

आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडणारे बलविंदर संधू, लालचंद रजपूत, चंद्रकांत पंडित, प्रवीण अमरे, सुलक्षण कुलकर्णी, पारस म्हांब्रे, समीर दिघे आणि विनायक सामंत यांनी मुंबईचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. यापैकी अनेकांनी मुंबईला रणजी विजेतेपदसुद्धा जिंकून दिले आहे. प्रशिक्षकांच्या यादीत आचरेकर सरांनंतर शारदाश्रम विद्यामंदिर शाळेचे प्रशिक्षकपद सांभाळणारे नरेश चुरी यांच्यासह पांडुरंग साळगावकर, अमित दाणी, विनायक माने, किरण पोवार, ओंकार खानविलकर, संदेश कवळे, राजा अधटराव, मनोज जोगळेकर, जय धुरी, मयूर कद्रेकर, नितीन खाडे, लक्ष्मण चव्हाण, विशाल जैन, श्रेयस खानोलकर, विनोद राघवन यांचाही समावेश होतो.

गेली वीस वर्ष तेंडुलकरने क्रिकेट चाहत्यांना भरभरून दिले. त्यामुळे आपल्या कारकिर्दिच्या निरोपाच्या सामन्यात तेंडुलकरने भाषणात आचरेकर सरांच्या नावाचा उल्लेख केला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रुंचा बांध फुटला. तो म्हणाला होता,'' वयाच्या 11 व्या वर्षी माझ्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. माझा भाऊ अजित याने मला आचरेकर सरांकडे घेऊन गेला तो कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. ते मला स्वतःच्या स्कुटरवरून सराव सामन्याला घेऊन जायचे.''
पाहा व्हिडीओ...

 

Web Title: Sachin Tendulkar speechless when he took name of Ramakant Acharekar sir in his last match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.