- रवींद्र चोपडेमहान फलंदाज सचिन तेंडुलकरने कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी योद्ध्यांबाबत आदर राखताना आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत एक आदर्श घालून दिला. सचिन तेंडुलकरने आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत जगभरात आक्रमक वेगवान गोलंदाज व सर्वोत्तम फिरकीपटूंना तोंड दिले. त्याच्या स्वर्णिम क्रिकेट कारकिर्दीत त्याचे समर्पण निर्विवाद होते, यात कुणाचे दुमत नाही.सचिनने पाकिस्तानविरुद्ध कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. मालिकेतील अंतिम कसोटीमध्ये वकार युनूसचा एक चेंडू १६ वर्षांच्या सचिनच्या तोंडावर आदळला होता, पण तंबूत परतण्याऐवजी या दिग्गज फलंदाजाने प्रत्युत्तर दिले आणि वकारसह पाकिस्तानच्या सर्वच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना अर्धशतक झळकावत भारताला पराभवाच्या खाईतून बाहेर काढले. पदार्पणाच्या मालिकेतील सचिनचा या खेळातील समर्पण व खंबीरवृत्ती भविष्यात त्याला महान क्रिकेटपटूंच्या पंक्तीत स्थान मिळविण्यास पुरेशी ठरली.वडिलांच्या निधनानंतर झळकावलेले शतक कसे विसरता येईल. १९९९ सालच्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान सचिनच्या वडिलांचे निधन झाले होते. सचिन अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडहून भारतात परतला होता. त्यानंतर परत इंग्लंडला गेला आणि केनियाविरुद्ध शानदार शतकी खेळी केली. हे शतक त्याने वडिलांना समर्पित केले होते. वडिलांच्या निधनानंतर भावनांवर नियंत्रण राखत मैदानावर उतरत शतक झळकावण्यासारखे असाधारण कार्य केवळ समर्पणाची वृत्ती असलेले खेळाडूच करू शकतात. २००४ मध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यात सचिनने सिडनी कसोटीमध्ये द्विशतकी (नाबाद २४१) खेळी केली होती. या द्विशतकाची विशेषता ही होती की, त्याने या खेळीदरम्यान आपला आवडता कव्हर ड्राईव्हचा फटका मारला नव्हता. कारण या दौºयात तो अनेकदा कव्हर ड्राईव्ह खेळताना बाद झाला होता.सचिनच्या अविस्मरणीय खेळी...१६ वर्षांच्या सचिनने पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीत पहिल्याच मालिकेत इम्रान खान, वकार युनूस आणि वसीम अक्रम या वेगवान त्रिकूटाविरुद्ध ५७ धावांची खेळी करीत लक्ष वेधले होते.१७ व्या वर्षी इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर सचिनने पहिले शतक झळकावले. ४०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाºया भारताने ३५ धावात दोन फलंदाज गमवाल्यानंतर सचिनने संयमी खेळी करीत नाबाद ११९ धावा केल्या. ही कसोटी अनिर्णीत राहिली होती.१८ वर्षांच्या युवा सचिनने आॅस्ट्रेलिया दौºयात १९९२ ला पर्थमध्ये अविस्मरणीय शतक ठोकले होते. यजमानांच्या माºयापुढे सर्व भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली होती. सचिनने मात्र कमालीचा संयम राखून ११४ धावा केल्या. याशिवाय याच संघाविरुद्ध १९९९ ला मेलबोर्न येथे आणि २००४ ला सिडनीत ठोकलेल्या नाबाद २४१ धावा आजही चाहत्यांच्या कायम आठवणीत आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- खंबीर वृत्ती त्याचप्रमाणे समर्पणाचे प्रतीक सचिन
खंबीर वृत्ती त्याचप्रमाणे समर्पणाचे प्रतीक सचिन
सचिन तेंडुलकरने आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत जगभरात आक्रमक वेगवान गोलंदाज व सर्वोत्तम फिरकीपटूंना तोंड दिले. त्याच्या स्वर्णिम क्रिकेट कारकिर्दीत त्याचे समर्पण निर्विवाद होते, यात कुणाचे दुमत नाही.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 2:17 AM