मुंबई : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात आपले अबाधित स्थान निर्माण केले होते. पण महेंद्रसिंग धोनी या अनुभवी खेळाडूंना बाहेर काढून स्वत:चा संघ बनवू पाहत होता. यामध्ये त्याने सचिनच्या भविष्याचा निर्णयही घेतला होता, हे ऐकल्यावर साऱ्यांनाच धक्का बसला आहे. हा खुलासा भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने केला आहे.
भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०१२ साली धोनीने सचिनबाबत एक भविष्यवाणी केली होती. धोनीने २०१२ सालीच संघातील सहकाऱ्यांना, सचिन पुढचा विश्वचषक खेळणार नाही, हे सांगून टाकले होते. हे जेव्हा धोनीने संघातील खेळाडूंना सांगितले, तेव्हा साऱ्यांनाच मोठा धक्का बसला होता.
मोठा खुलासा; धोनीला सचिन, सेहवाग आणि गंभीर संघात नको होते
मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या सर्व ठिकाणी होताना दिसत आहेत. पण जेव्हा धोनी कर्णधार होता, तेव्हा त्याने संघात मोठे बदल केले होते. त्याचबरोबर संघातील अनुभवी खेळाडूंबद्दल त्याचे चांगले मत नव्हते, असेही पुढे आले आहे. आता तर एक मोठा खुलासा पुढे आला आहे. धोनीला आपल्या संघात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद सेहवाग आणि गौतम गंभीर नको होते. हा मोठा खुलासा दस्तुरखुद्द गंभीरनेच केला आहे.
भारतीय संघ २०१२ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी धोनीला भारताच्या अंतिम अकरा जणांच्या संघात सचिन, सेहवाग आणि गंभीर नको होते. या तिघांचेही क्षेत्ररक्षण चांगले नाही, अशी सबब धोनीने दिली होती.
याबाबत गंभीरने इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, " धोनीला मी, सचिन आणि सेहवाग एकत्र भारताच्या संघात नको होतो. आमचे क्षेत्ररक्षण चांगले नाही, असे कारण धोनीने दिले होते. माझ्यासाठी हा सर्वात मोठा धक्का होता."
महेंद्रसिंग धोनी पुढचे दोन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. या कालावधीत निमलष्करी जवानांसोबत 'ऑन फिल्ड' काम करायचं त्यानं पक्कं केलं आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिली. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड रविवारी होणार आहे. या दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचा निर्णय धोनीनं निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली यांना कळवला आहे.