ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक मैत्री दिन अर्थात Friendship Day म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या बालपणीच्या किंवा आताच्या मित्रांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. पण, आपण पाहत असलेला हा फोटो सोशल मीडियावर जास्तच व्हायरल झाला आहे. या फोटोत दिसणाऱ्या मुलांपैकी एक भारताचा महान फलंदाज आहे. टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूनं त्याच्या बालपणीच्या मित्रांसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
भारताच्या या क्रिकेटपटूनं 200 कसोटीत 15921 धावा केल्या आहेत. कसोटीत 15 हजार धावांचा पल्ला पार करणारा तो एकमेव फलंदाज आहे. शिवाय 463 वन डे सामन्यांत 44.83च्या सरासरीनं 18426 धावा केल्या आहेत. त्यात 49 शतकांचा समावेश आहे. वन डे द्विशतक झळकावणारा तो पहिला पुरुष क्रिकेटपटू आहे. आतापर्यंत तुम्ही ओळखलंच असेल ती तो महान फलंदाज कोण आहे तो? सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
तेंडुलकरनं लिहिलं की,''क्रिकेटच्या मैदानावरील फ्लडलाईटप्रमाणे मैत्री असते. आपल्या आयुष्यातील यशाचं ते एका कोपऱ्यात बसून आनंद लुटतात, परंतु जेव्हा सुर्य मावळतीला जाताना दिसताच ते आपल्यासाठी उजेड घेऊन येतात. माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा फ्रेंडशीप डे आहे.''
आयर्लंडच्या 21 वर्षीय कर्टीस कॅम्फरनं पटकावलं दिग्गजांच्या पंक्तित स्थान!
मोठी बातमी; IPL बरोबर यूएईत रंगणार महिलांची ट्वेंटी-20 चॅलेंज लीग, सौरव गांगुलीनं दिले संकेत
कारगिल युद्धात भारताविरुद्ध सीमेवर लढण्यास तयार होतो; शोएब अख्तरचा दावा