Sachin Tendulkar wishes Sara Tendulkar on Birthday: बाप आणि लेक यांच्यातील नातं काही औरच असतं. मुलगी कितीही मोठी झाली तरी वडीलांसाठी मात्र ती लहानच असते. प्रत्येक वडील आपल्या मुलीचे पालक तर असतातच, पण त्यासोबतच रक्षकदेखील असतात. आपल्या मुलीला संवेदनशील बनवणं आणि त्यासोबच कणखर बनवणं ही जबाबदारी प्रत्येक वडील पार पाडतात. त्यातच वडील आणि मुलगी दोघेही सेलिब्रिटी असतील तर अशा बाप-लेकीच्या जोडीची चर्चा झाली नाही तरच नवल... सेलिब्रिटी बाप-लेकीच्या जोडीतील एक नाव म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि त्याची मुलगी मॉडेल आणि लघुउद्योजिका सारा तेंडुलकर.सारा तेंडुलकरचा आज वाढदिवस असल्याने सचिनने तिला खास शुभेच्छा दिल्यात. त्यासोबत दोन छानसे फोटोही शेअर केले आहेत.
सचिनने आपल्या लेकीला शुभेच्छा देण्यासाठी सारासोबतचे दोन खास फोटो पोस्ट केले आहेत. एकाच सारा खूपच लहान आहे. ती गोंडस बाळासारखी सचिनच्या मांडीवर बसून फोटोसाठी पोज देताना दिसतेय. तर दुसऱ्या फोटोत मोठी आणि मॅच्युअर झालेली सारा आपल्या वडीलांशी संवाद साधताना आणि धमाल मस्तीच्या गप्पा मारताना दिसतेय. या दोन फोटोंमधील साराचा प्रवास सचिनने मोजक्या शब्दांत मांडला आहे. "एक छोटीशी मुलगी ते एक अप्रतिम युवती... तुझा हा थक्क करणारा प्रवास मला नेहमीच आश्चर्यचकित करतो. मी खूप नशीबवान आहे की तू माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस. दररोज तुझे माझ्यावरील प्रेम पाहून मला खूप आनंद होतो. सारा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा," अशी छोटीशी पोस्ट लिहून सचिनने लेकीला गोड शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सचिन आणि अंजली तेंडुलकर यांची मोठी मुलगी म्हणजे सारा. सारा ही सुरुवातीला प्रसिद्धीपासून लांब होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये आधी स्टारकीड, नंतर मॉडेल आणि आता एक लघुउद्योजिका या वेगवेगळ्या भूमिकांतून ती चर्चेत असते. सोशल मीडियावरही साराच्या फोटो आणि व्हिडीओंची चर्चा असते. साराने आपल्या आईप्रमाणेच वैद्यकीय शिक्षक पूर्ण केले आहे. ग्लॅमर क्षेत्रातही तिने छाप उमटवली आहेच. त्यासोबत स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर ती कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. साराचा स्वत:चा ऑनलाईन बिझनेस असून 'सारा प्लॅनर्स' नावाने ती या डायरीची विक्री करते. याशिवाय अनेक ब्रँडसाठीही सारा मॉडेलिंग करताना दिसते.