टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या दहा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले आहेत. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची तुलना नेहमीच महान फलंदाज सचिन तेंडुलकरशी केली जात आहे. पण, पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरला ही तुलना चुकीची वाटते. तेंडुलकर हा सर्वोत्तम फलंदाज आहे आणि त्याचे विक्रम मोडणे अवघड आहे. असे अनेक विक्रम आहेत, की ज्याचा आसपासही कुणी जाऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर 34357 धावा आहेत. अख्तरच्या मते सचिन आजच्या युगात खेळला असता तर त्याने सहज 1 लाख 30 हजार धावा केल्या असत्या.
नशीबाचं चक्र फिरलं; आजारी वडिलांना घेऊन 1200 किमी प्रवास करणाऱ्या ज्योतीसाठी आनंदवार्ता
दोन वेगळ्या दशकातील खेळाडूंची तुलना करणे अवघडच आहे. त्या त्या वेळची परिस्थिती वेगवेगळी होती. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये 50च्या सरासरीनं धावा करणाऱ्या सध्याच्या फलंदाजांत कोहली हा एकमेव खेळाडू आहे. त्यानं भारतासाठी 21901 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आंहेत आणि सचिनच्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाजवळ तो पोहोचू शकतो. पण, अख्तरसाठी ही तुलना चुकीची आहे. तो म्हणाला,''क्रिकेटच्या सर्वाधिक खडतर युगात सचिन खेळला. त्याला आता खेळण्याची संधी मिळाली असती, तर त्याने सहज 1 लाख 30 हजार धावा केल्या असत्या. त्यामुळे सचिन व कोहलीची तुलना करणे चुकीचे आहे.''
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानेही सचिन व कोहली यात महान फलंदाजाची निवड केली. तो म्हणाला,''मी सचिनची निवड करेन. सचिन ज्या युगात क्रिकेट खेळला त्यावेळी संपूर्ण 50 षटके एकाच चेंडूनं टाकली जायची आणि सीमारेषेवर पाच खेळाड असायचे. असे असतानाही सचिननं धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे मी त्याचीच निवड करेन. नव्या नियमानुसार फलंदाजांना खुप मदत मिळत आहे.''