सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल यांच्या अफेयरची चर्चा ठरली खरी? सचिन तेंडुलकरच्या कन्येच्या कृतीनं पुन्हा चर्चा

भारतीय संघाचा युवा खेळाडू शुबमन गिल ( Shubman Gill) याला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 05:32 PM2021-06-25T17:32:20+5:302021-06-25T17:35:08+5:30

whatsapp join usJoin us
Is Sachin Tendulkar's daughter Sara Tendulkar dating India opener Shubman Gill? Latest move suggests so | सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल यांच्या अफेयरची चर्चा ठरली खरी? सचिन तेंडुलकरच्या कन्येच्या कृतीनं पुन्हा चर्चा

सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल यांच्या अफेयरची चर्चा ठरली खरी? सचिन तेंडुलकरच्या कन्येच्या कृतीनं पुन्हा चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा युवा खेळाडू शुबमन गिल ( Shubman Gill) याला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. पण, आणखी एक कारणानं तो पुन्हा चर्चेत आला आहे. शुबमनचं नाव सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar) हिच्याशी जोडलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी गुगल या सर्च इंजिनवर शुबमन गिलची पत्नी म्हणून सारा तेंडुलकरचं नाव दाखवलं जात होतं. WTC फायनलपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शुबमननं आपण सिंगल असल्याचे सांगून या चर्चांना पूर्णविराम लावला होता. मात्र, आता या दोघांच्या नात्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

टीम इंडिया राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेला भिडणार; अशी आहे 'दी वॉल'ची सपोर्ट टीम!

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करतात. इतकंच नव्हे तर एकमेकांच्या पोस्टला लाईक्स व इमोजीही पोस्ट करतात. सारानं अनेकदा इंस्टा स्टोरीवर शुबमन खेळतानाच फोटो पोस्ट केले आहेत. शुबमन साराच्या कुटुंबीयातील सर्व सदस्यांना फॉलो करतो आणि यात आश्चर्य वाटण्यासाठी कोणतीच बाब नाही.

पण, सारा भारताच्या युवा फलंदाजाच्या बहिणींनाही सोशल मीडियावर फॉलो करते. त्यामुळे पुन्हा एकदा सारा व शुबमन यांच्या अफेयर्सच्या चर्चांनी जोर पकडला आहे. सारा इंस्टाग्रामवर सेहनिल गिलला फॉलो करते.


  
या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल काहीच मत व्यक्त केलेले नाही. पण, सोशल मीडियावरील त्यांच्या काही कमेंट्सनं अफेयर्सच्या चर्चांना खतपाणी नक्की मिळाले. या दोघांनी काहीवेळा एकसारखीच पोस्ट केली आहे..

Web Title: Is Sachin Tendulkar's daughter Sara Tendulkar dating India opener Shubman Gill? Latest move suggests so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.