भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन ७ वर्ष उलटून गेली, तरीही त्याची जादू आजही कायम आहे. रविवारी तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडियन लिजंड ( India Legends) संघानं रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ( Road Safety World Series) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका लिजंडवर विजय मिळवून जेतेपद पटकावलं. पण, आज तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यामागे कारण ठरतेय ती त्याची BMW X5M कार... तेंडुलकरची ही कार पुन्हा विक्रिसाठी OLXवर आली आहे. ताफ्यात कोट्यवधींच्या गाड्या, परंतु सचिनसाठी 'ती' गाडी आहे खास!
सचिन तेंडुलकरकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. तेंडुलकर BMWचा ग्लोबल सदिच्छादूत राहिला आहे. २००२मध्ये तेंडुलकरच्या ताफ्यात BMW X5M दाखल झाली होती. बीच ब्ल्यू (Lagoon Bleach Blue) रंगाची ही गाडी पाहून सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. पण, काही वर्षांपूर्वी तेंडुलकरनं ही BMW कार विकली होती. पण, आता ती पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध आहे. सध्या ही कार नाशिकमध्ये असल्याची माहिती आहे. कारच्या ओडोमीटरनुसार ८९,००० किलोमीटरचं रनिंग पूर्ण झालेलं आहे. ही कार १५ लाख रुपयांना विक्रीस ठेवल्याची माहिती आहे. सचिन तेंडुलकरचा बंगला आतून कसा दिसतो माहित्येय? पाहा Photo