Sachin Tendulkar Statue: वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा उंच पुतळा बसवला जाणार; पाहा केव्हा

Sachin Tendulkar Statue : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा पुतळा बसवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:30 AM2023-02-28T10:30:50+5:302023-02-28T10:31:08+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar's Life-size Statue to be Installed at Mumbai's Wankhede Stadium | Sachin Tendulkar Statue: वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा उंच पुतळा बसवला जाणार; पाहा केव्हा

Sachin Tendulkar Statue: वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा उंच पुतळा बसवला जाणार; पाहा केव्हा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sachin Tendulkar Statue : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच मैदानावर सचिनने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. क्रिकेट अधिकार्‍यांच्या मते, या पुतळ्याचे अनावरण २४ एप्रिल, सचिन तेंडुलकरच्या पन्नासाव्या वाढदिवसादिवशी किंवा या वर्षीच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान केले जाऊ शकते. एप्रिलमध्ये पुतळ्याचे अनावरण केल्यास मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आयपीएल २०२३ दरम्यान  तो पाहता येईल.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या घोषणेची पुष्टी केली. वानखेडे स्टेडियमवर हा पहिलाच पुतळा असेल, तो कुठे ठेवायचा हे आम्ही ठरवू, असेही ते म्हणाले. तेंडुलकर भारतरत्न आहेत आणि त्यांनी क्रिकेटसाठी काय केले हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवशी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून  एक लहान भेट म्हणून हा पुतळा उभारण्यात येईल. मी तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्याशी बोललो आणि त्यांची संमती घेतली."

सचिन तेंडुलकरने भारताकडून २०० कसोटी सामने, ४६३ वन डे आणि १ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने सर्वाधिक ३४,३५७ धावा आणि १०० शतके  झळकावली आहेत. वानखेडे स्टेडियमवर याआधी तेंडुलकरचे नाव स्टँडला दिले गेले आहे. एमसीएने गेल्या हंगामात सुनील गावस्कर यांच्या स्मरणार्थ कॉर्पोरेट बॉक्स आणि दिलीप वेंगसरकर यांच्या सन्मानार्थ स्टँड समर्पित करण्याचा निर्णय घेतला.


देशभरातील स्टेडियममध्ये क्रिकेटपटूंचे फारसे पुतळे नाहीत. इंदूरमधील होळकर स्टेडियम, आंध्र प्रदेशमधील व्हीडीसीए स्टेडियम आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे माजी भारतीय महान सीके नायडू यांचे तीन वेगवेगळे पुतळे आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Sachin Tendulkar's Life-size Statue to be Installed at Mumbai's Wankhede Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.