सौरव गांगुलीच्या घरी सचिन तेंडुलकरचा 'लज्जतदार' पाहुणचार!

90च्या दशकातील क्रिकेटचाहत्यांना हा फोटो नक्की आवडेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 01:49 PM2020-05-15T13:49:25+5:302020-05-15T13:49:52+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar's Throwback Picture With Sourav Ganguly svg | सौरव गांगुलीच्या घरी सचिन तेंडुलकरचा 'लज्जतदार' पाहुणचार!

सौरव गांगुलीच्या घरी सचिन तेंडुलकरचा 'लज्जतदार' पाहुणचार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर ही जगातील सर्वात यशस्वी सलामीवीरांची जोडी.. या दोघांचा विक्रम अजूनही कोणत्याही सलामीच्या जोडीला मोडता आलेला नाही. दोन दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) या दोघांचा एकत्रित फोटो पोस्ट करताना चाहत्यांना जुन्या काळात नेलं होतं. गुरुवारी सचिन तेंडुलकरनं जुनी आठवणं ताजा करणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

या दोघांची मैत्री मैदानाबाहेरही अनेकदा पाहायला मिळली आहे. भारतीय क्रिकेटमधील हे दोन दिग्गज एकमेकांचे किती घनिष्ठ मित्र आहेत, याची प्रचिती देणारा फोटो सचिननं शेअर केला. बंगाल टायगर गांगुलीनं त्याच्या घरी तेंडुलकरचा पाहुणचार केला होता. सचिननं तोच फोटो शेअर करताना गांगुलीच्या घरातील जेवणाचं कौतुक केलं.  

तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमध्ये 463 सामन्यांत 18426 धावा केल्या आहेत आणि त्यात 49 शतकांचा समावेश असून नाबाद 200 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. गांगुलीनं 311 वन डेत 41.022च्या सरासरीनं 22 शतकांसह 11363 धावा केल्या आहेत. 183 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.  आयसीसीनं  मंगळवारी तेंडुलकर-गांगुली यांच्यातील एक विक्रम पोस्ट केला. ''वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकाही जोडीला मिळून 6000 धावा करता आलेल्या नाहीत.''   


अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

रवी शास्त्रींची रोखठोक भूमिका; आधी आयपीएल, स्थानिक क्रिकेट सुरू व्हायला हवं, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप नंतर!

IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत

Video : सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा अन् हरभजन सिंग यांना युवराज सिंगचं चॅलेंज

Video : दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या घरी अचानक आले दिल्ली पोलीस अन्...

शाहिद आफ्रिदीचं जलद शतक अन् सचिन तेंडुलकरची बॅट; काय आहे नेमकं कनेक्शन?

Web Title: Sachin Tendulkar's Throwback Picture With Sourav Ganguly svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.