सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर ही जगातील सर्वात यशस्वी सलामीवीरांची जोडी.. या दोघांचा विक्रम अजूनही कोणत्याही सलामीच्या जोडीला मोडता आलेला नाही. दोन दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) या दोघांचा एकत्रित फोटो पोस्ट करताना चाहत्यांना जुन्या काळात नेलं होतं. गुरुवारी सचिन तेंडुलकरनं जुनी आठवणं ताजा करणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
या दोघांची मैत्री मैदानाबाहेरही अनेकदा पाहायला मिळली आहे. भारतीय क्रिकेटमधील हे दोन दिग्गज एकमेकांचे किती घनिष्ठ मित्र आहेत, याची प्रचिती देणारा फोटो सचिननं शेअर केला. बंगाल टायगर गांगुलीनं त्याच्या घरी तेंडुलकरचा पाहुणचार केला होता. सचिननं तोच फोटो शेअर करताना गांगुलीच्या घरातील जेवणाचं कौतुक केलं.
तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमध्ये 463 सामन्यांत 18426 धावा केल्या आहेत आणि त्यात 49 शतकांचा समावेश असून नाबाद 200 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. गांगुलीनं 311 वन डेत 41.022च्या सरासरीनं 22 शतकांसह 11363 धावा केल्या आहेत. 183 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. आयसीसीनं मंगळवारी तेंडुलकर-गांगुली यांच्यातील एक विक्रम पोस्ट केला. ''वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकाही जोडीला मिळून 6000 धावा करता आलेल्या नाहीत.''
IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत
Video : सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा अन् हरभजन सिंग यांना युवराज सिंगचं चॅलेंज
Video : दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या घरी अचानक आले दिल्ली पोलीस अन्...
शाहिद आफ्रिदीचं जलद शतक अन् सचिन तेंडुलकरची बॅट; काय आहे नेमकं कनेक्शन?