भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका व्यक्तीच्या शोधात असल्याचा व्हिडीओ अपलोड केला होता. त्यानं नेटीझन्सनाही त्या व्यक्तीला शोधण्यास मदत करण्याचे आवाहन केले होते. अखेर तेंडुलकर शोधात असलेली ती व्यक्ती सापडली. चेन्नईच्या ताज हॉटेलनं तेंडुलकरला ती व्यक्ती शोधून दिली.
तेंडुलकरं काय आवाहन केलं होतं?
तेंडुलकर निवृत्त होऊन सहा वर्ष झाली, परंतु आजही त्याची जादू क्रिकेटप्रेमींच्या मनात कायम आहे. तेंडुलकरनं भारतीयांना क्रिकेटवर जीवापाड प्रेम करायला शिकवलं. त्यामुळेच आजही तेंडुलकरची ओळख 'क्रिकेटचा देव' म्हणून कायम आहे. तेंडुलकरच्या प्रत्येक हालचालींवर, प्रत्येक ट्विटवर साऱ्यांचे लक्ष असते. शनिवारी क्रिकेटच्या देवानं नेटीझन्सना साद घातली होती. तेंडुलकर कोणत्यातरी व्यक्तीच्या शोधात आहे आणि ती व्यक्ती शोधून देण्यासाठी तेंडुलकरनं नेटीझन्सकडे मदत मागितली आहे होती.
कोण आहे ती व्यक्ती आणि तेंडुलकर का आहे तिच्या शोधात?
तेंडुलकरनं सांगितलं की,''मी एका हॉटेलमध्ये थांबलो होतो, तेव्हा मी कॉफीची ऑर्डर केली होती. तेव्हा एक वेटर कॉफी घेऊन रुममध्ये आला आणि त्यानं मला क्रिकेटविषयी बोलायचं आहे, तर बोलू का? असं विचारलं. तेव्हा मी होकार दिला. त्यानं मला सांगितलं की, सर जेव्हा तुम्ही आर्म गार्ड घालता तेव्हा तुमच्या बॅटीच्या रिफ्लेक्शनमध्ये बदल जाणवतो. यावर मी कधी जगात कोणाशी बोललो नव्हतो आणि ते केवळ मलाच माहित होतं. तो वेटर म्हणाला मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुमची फलंदाजी मी पुन्हा पुन्हा पाहतो. तेव्हा मला हे जाणवलं. त्याच्या या निरिक्षणावर मी होकार दिला. त्यानंतर मी माझं एलबो गार्डच्या डिझाईनमध्ये बदल करून घेतला आणि त्याचा मला खूप फायदा झाला.''
हॉटेल ताजनं तो व्हेटर शोधून काढला. गुरुप्रसाद असे त्या व्हेटरचं नाव आहे.
Web Title: Sachin Tendulkar's wait ends, Taj Hotels find employee who adviced Sachin during his playing days
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.