मुंबई - अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू रशिद खान नुकत्याच आटोपलेल्या आयपीएलमध्ये कमालीचा यशस्वी ठरला. गोलंदाजीबरोबरच काही सामन्यांमध्ये त्याने फलंदाजीतही चमक दाखवली. रशिदच्या या कामगिरीची दखल घेत खुद्द मास्टरब्लासर सचिन तेंडुलकरनेही त्याचे कौतुक केले. मात्र सचिनने केलेले कौतुकपर ट्विट पाहून रशिद खान अवाक झाला. क्रिकेटच्या या देवाला आता काय उत्तर द्यावे तेच त्याला कळेना. अखेर एक-दोन तासांनंतर त्याने सचिनला उत्तर दिले. 19 वर्षीय रशिद खानने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना 21 बळी टिपले होते. तसेच कोलकाता नाइटरायर्सविरुद्ध झालेल्या क्वालिफायर-2 मधील अष्टपैलू कामगिरीचेही विशेष कौतुक झाले. जगभरातील दिग्गज खेळाडूंनी त्याची प्रशंसा केली. मात्र या सर्वांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलेले कौतुकपर ट्विट पाहून रशिद खानला धक्का बसला. याबाबत रशिद म्हणाला की, जेव्हा मी टीमच्या बसमध्ये चढत होतो, तेव्हा माझ्या एका मित्राने मला सचिनच्या ट्विटचा स्क्रिनशॉट पाठवला. ते ट्विट पाहून मला आश्चर्य वाटले. आता सचिन सरांना काय उत्तर द्यायचे? या विचारात मी पडलो. अखेरीस एक दोन तासांनंतर मी उत्तर दिले." "मला वाटते संपूर्ण अफगाणिस्ताने सचिन सरांचे ट्विट पाहिले, असेल. सचिन सर अफगाणिस्तानमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी माझे केलेले कोतुक पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांची अशी वक्तव्ये युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी ठरतात." असे रशिद खान म्हणाला. तसेच भारतात भारतीय क्रिकेटपटूंना जसे प्रेम मिळते. तसे अफगाणिस्तानात मिळते का असे विचारले असता. अफगाणिस्तानमध्ये आपण राष्ट्रपतींनंतर आपणच प्रसिद्ध असल्याचे त्याने लाजत लाजत सांगितले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- सचिनच्या ट्विटने रशिद खान झाला अवाक्, उत्तर काय द्यावे तेच कळेना
सचिनच्या ट्विटने रशिद खान झाला अवाक्, उत्तर काय द्यावे तेच कळेना
रशिदच्या या कामगिरीची दखल घेत खुद्द मास्टरब्लासर सचिन तेंडुलकरनेही त्याचे कौतुक केले. मात्र सचिनने केलेले कौतुकपर ट्विट पाहून रशिद खान अवाक झाला.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 3:10 PM