नवी दिल्ली : ‘सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांच्यातील मैदानावरील टक्कर शानदार असायची. यामध्ये अनेकदा सचिननेच बाजी मारली आहे. सचिनने वॉर्नला अनेकदा आपल्या तालावर नाचवले आहे,’ अशी कबुली आॅस्टेÑलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने दिली.सचिनने वॉर्नविरुद्ध अनेक संस्मरणीय खेळी केल्या. त्याने वॉर्नचा समावेश असलेल्या आॅस्टेÑलिया संघाविरुद्ध १२ कसोटी सामने खेळले असून, त्यामध्ये ६०हून अधिक सरासरीने धावा काढल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वॉर्नचा समावेश असलेल्या आॅस्टेÑलिया संघाविरुद्ध सचिनने १७ एकदिवसीय सामन्यांत ५८.७०ची सरासरी आणि पाच शतकांच्या जोरावर ९९८ धावा कुटल्या आहेत. ब्रेट लीने सचिन-वॉर्न लढाईच्या आठवणींना उजाळा देतानाच स्वत: मिळवलेल्या सचिनच्या बळीचा आनंदही व्यक्त केला. एका आघाडीच्या क्रीडा वाहिनीच्या ‘क्रिकेट कनेक्ट’ कार्यक्रमामध्ये लीने म्हटले की, ‘अनेकदा सचिन पुढे येऊन खेळताना वॉर्नला आखूड टप्प्याचा मारा करण्यास भाग पाडत असे. तसेच काही वेळा तो बॅकफूटवर जाऊन चेंडू बॅटवर येण्याची प्रतीक्षा करत शानदार फटका मारत असे. हे एक प्रकारे वॉर्नला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्यासारखे होते. वॉर्नसोबत खूप कमी फलंदाज असे करू शकत होते. मात्र सचिन अनेकदा असे करायचा.’‘सचिनला बाद करण्यासाठी वॉर्न अनेक पद्धतींचा वापर करायचा, मात्र सचिन वॉर्नच्या हातून चेंडू सुटताच त्याचा अचूक अंदाज बांधण्यात तरबेज होता. (वृत्तसंस्था)त्यामुळे जगभरातील फलंदाजांवर वर्चस्व गाजवणारा वॉर्न सचिनविरुद्ध मात्र अपयशी ठरायचा.’ सचिनच्या शैलीचे कौतुक करताना ली म्हणाला, ‘गोलंदाजाच्या प्रत्येक चेंडूचा ज्याप्रकारे सचिन अंदाज बांधायचा आणि प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध ज्याप्रकारे विविध तंत्राचा वापर करायचा ते शानदार होते. वॉर्न अनेकदा हवेतच चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा कधी वॉर्न विविधता आणण्याचा प्रयत्न करायचा, ते सचिनला लगेच कळायचे. या गोष्टीचा वॉर्नला राग यायचा.’ वॉर्नने १२ कसोटी सामन्यांत केवळ तीन वेळाच सचिनला बाद करण्यात यश मिळवले आहे.>सचिनने केले पृथ्वी शॉ याला मार्गदर्शनआपल्या क्रिकेट कारकिर्दीत आदर्श खेळाडू म्हणून ओळख निर्माण करणाºया सचिन तेंडुलकरने युवा फलंदाज पृथ्वी शॉसोबत चर्चा केली व त्याला मार्गदर्शन केले.२० वर्षीय पृथ्वी शॉने कसोटी कारकिर्दीची शानदार सुरुवात करताना पदार्पणाच्या लढतीत शतकी खेळी केली होती. अशी कामगिरी करणारा तो सर्वांत युवा फलंदाज ठरला होता. टाचेची दुखापत व डोप चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याला १६ महिने क्रिकेट मैदानापासून दूर राहावे लागले.तेंडुलकर म्हणाला, ‘होय, ते खरे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पृथ्वीसोबत (शॉ) माझी अनेकदा चर्चा झाली. तो प्रतिभावान खेळाडू असून त्याची मदत केल्यामुळे मी खूश आहे. मी त्याच्यासोबत क्रिकेट व या खेळाच्या बाहेरच्या जीवनाबाबत चर्चा केली होती.’बोलण्याचे मात्र सचिनने टाळले. सचिन म्हणाला, ‘माझ्या मते जर कुणी युवा खेळाडू माझ्यासोबत संपर्क साधत असेल आणि माझ्याकडून मार्गदर्शन मागत असेल तर किमान माझ्याकडून तरी गुप्तता पाळली गेली पाहिजे.>पहिल्याच चेंडूवर केले सचिनला बादलीने २००३ साली मेलबर्न येथे झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या आठवणींनाही उजाळा दिला. या सामन्यात लीने पहिल्यांदा सचिनचा सामना केला होता आणि पहिल्याच चेंडूवर त्याने सचिनला यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्टकरवी झेलबाद केले होते.>लीने म्हटले की, ‘तेव्हा मी २२ वर्षांचा होतो. मी टाकलेला चेंडू सचिनच्या बॅटला कडेला स्पर्श करून मागे गेला आणि मी माझे काम केले. मला त्यावेळी कसोटी सामन्याची चिंता नव्हती, कारण मी सचिन तेंडुलकरचा बळी मिळवून खूप खूश होतो.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- सचिन वॉर्नला अनेकदा आपल्या तालावर नाचवायचा - ब्रेट ली
सचिन वॉर्नला अनेकदा आपल्या तालावर नाचवायचा - ब्रेट ली
‘सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांच्यातील मैदानावरील टक्कर शानदार असायची.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 4:08 AM