मुंबई : सध्याच्या घडीला महान टेनिसपटू रॉजर फेडररचा एक फटका चांगलाच वायरल झाला आहे. बिम्बल्डनच्या एका सामन्यात फेडररने चक्क क्रिकेटचा एक फटका लगावला आणि तो चर्चेला विषय ठरला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यावर एक ट्विट केलं आहे. सचिनने जे सांगितलं आहे, तसं झालं सचिन टेनिस आणि फेडरर क्रिकेट खेळताना आपल्याला दिसू शकतील.
फेडररचा या फटक्याचा मोह आयसीसीलाही आवरता आला नाही. आयसीसीने बिम्बल्डनकडे या फटक्याची रेटींग मागितली. विम्बल्डनच्या ट्विटर हँडलने क्षणाचाही अवधी न मागता फेडरर आणि सचिन यांचा एकत्रित असलेला फोटो त्यांना पाठवला. या फोटोखाली त्यांनी " जेव्हा महानतेला महानतेची ओळख होते, " असे लिहिले. सध्याच्या घडीला हे ट्विट आणि फेडररचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.
फेडररने टेनिस कोर्टवर खेळला असा क्रिकेटचा फटका
भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही या गोष्टींची दखल घेतली आहे. त्याचबरोबर सचिनने याबाबत एक ट्विटही केलं आहे. या ट्विटमध्ये सचिन म्हणाला आहे की, " फेडररने जर नवव्यांदा विम्बल्डन जेतेपदाला गवसणी घातली तर आम्ही दोघे एकमेकांचे खेळ शिकू. " त्यामुळे जर फेडरर ही विम्बल्डन स्पर्धा जिंकला तर सचिन टेनिस आणि फेडरर क्रिकेट खेळताना तुम्हाला दिसू शकतात.
सचिनने असे केले ट्विट