Sack Rohit Sharma Trending, Asia Cup 2022: "रोहित शर्माला कर्णधारपदावरून हाकला..."; संतप्त चाहते 'हिटमॅन'च्या उर्मट वागणुकीवर नाराज

रोहित अन् टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर फॅन्सचा प्रचंड संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 08:46 PM2022-09-07T20:46:07+5:302022-09-07T20:46:59+5:30

whatsapp join usJoin us
Sack Rohit Sharma trending on Twitter as Team India captain arrogant behaviour makes fans angry in Asia Cup Virat Kohli comparison | Sack Rohit Sharma Trending, Asia Cup 2022: "रोहित शर्माला कर्णधारपदावरून हाकला..."; संतप्त चाहते 'हिटमॅन'च्या उर्मट वागणुकीवर नाराज

Sack Rohit Sharma Trending, Asia Cup 2022: "रोहित शर्माला कर्णधारपदावरून हाकला..."; संतप्त चाहते 'हिटमॅन'च्या उर्मट वागणुकीवर नाराज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sack Rohit Sharma Trending on Twitter, Asia Cup 2022: भारतीय संघाची आशिया चषक स्पर्धेत फार विचित्र अवस्था झाली आहे. टी२० मध्ये सलग १७ विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीत सलग दोन जिव्हारी लागणारे पराभव झेलावे लागले आहेत. स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध विजयी सलामी देत भारताने सुरूवात केली होती. नंतर हाँगकाँगलाही पराभूत करत संघाने दिमाखात सुपर-४ फेरी गाठली. पण सुपर-४ मध्ये भारतावर नशिब रूसलं. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने (IND vs PAK) भारताला ५ गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने (IND vs SL) भारताला ६ गडी राखून पराभूत केले. टीम इंडियाचा दोन सामन्यात पराभव झाल्याने आता, फायनल गाठण्यासाठी भारताचे भवितव्य लांबचा शेजारी असलेल्या अफगाणिस्तावर आहे. भारतीय संघाची अशी अवस्था होईल, अशी चाहत्यांना मूळीच अपेक्षा नव्हती. अशा परिस्थितीत चाहत्यांनी रोहित शर्माची कर्णधारपदावरून हकालपट्टी (Sack Rohit) करा, अशी मागणी सोशल मीडियावर लावून धरल्याचे दिसत आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ICC च्या स्पर्धा जिंकता आल्या नाहीत. विराटने नेतृत्व केलेली शेवटची स्पर्धा म्हणजे गेल्या वर्षीच्या टी२० स्पर्धेत भारताला लाजिरवाण्या पराभवांना सामोरे जावे लागले. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर सुधरेल असं चाहत्यांना वाटत होते. रोहितने कर्णधारपदाचा ताबा घेतल्यापासून अनेक सामने आणि मालिका जिंकल्या. पण मोठ्या स्पर्धेत मात्र टीम इंडियाची हाराकिरी अद्यापही सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सॅक रोहित म्हणजेच रोहितला हाकला, असा ट्रेंड ट्विटरवर दिसतोय. अर्शदीप आणि भुवनेश्वरने झेल सोडल्यानंतर रोहितटी मैदानावर उद्धट वर्तणूक, अर्शदीप फिल्डिंगबाबत चर्चा करत असताना रोहितने त्याच्याकडे केललं दुर्लक्ष याच्या छोट्या-छोट्या व्हिडीओ पोस्ट करत, चाहते रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी करत आहेत. पाहूया त्यापैकी काही निवडक ट्विट्स-

--

--

--

--

--

--

--

--

दरम्यान, भारतीय संघ व्यवस्थापनाने गेल्या वर्षभरात तब्बल ८ वेगवेगळे कर्णधार बदलून पाहिले आहेत. काही वेळा भारताला विजय मिळाला, तर काही वेळा पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघ विविध प्रयोग करताना दिसत आहे. त्यामुळे विजय-पराभव होणारच असे चाहतेही गृहित धरून होते. पण आशिया चषक स्पर्धेसारख्या प्रतिष्ठेच्या सामन्यात, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभूत होणे चाहत्यांना मूळीच रुचलेले नाही. तसेच अफगाणिस्तानने सुरूवातीच्या सामन्यात पराभूत केलेल्या श्रीलंकेने भारतीय गोलंदाजांविरूद्ध १७०पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केल्यानेही चाहते संतप्त आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांनी ट्विटरवर रोहित शर्माला कर्णधारपदावरून हाकला, असा ट्रेंड चालवला आहे. आता याची झळ कोणाला व किती बसते, ते येणारा काळच ठरवेल. 

Web Title: Sack Rohit Sharma trending on Twitter as Team India captain arrogant behaviour makes fans angry in Asia Cup Virat Kohli comparison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.