Join us  

Ravi Shastri : माझ्यासाठी दुःखाचा दिवस, हा संघ आपण मिळून तयार केला होता; रवी शास्त्री यांची भावनिक पोस्ट

Ravi Shastri on Virat Kohli's decision : भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयाचा सर्वात मोठा धक्का माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बसणे साहजिक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 9:47 PM

Open in App

Ravi Shastri on Virat Kohli's decision : भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयाचा सर्वात मोठा धक्का माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बसणे साहजिक आहे. २०१४ पासून रवी शास्त्री टीम इंडियासोबत आहेत आणि २०१७नंतर त्यांचे व विराटचे नाते आणखी घट्ट झाले. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं देशात-परदेशात ऐतिहासिक विजय मिळवले. त्यामुळे विराटच्या आजच्या निर्णयानं शास्त्री गुरुजींना धक्का बसला. हा माझ्यासाठी सर्वात दुःखाचा दिवस असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.   विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्वाधिक ४० ( ६८ सामन्यांपैकी) कसोटी सामने जिंकले. २०१४साली रवी शास्त्री यांची आठ महिन्यांकरीता भारतीय संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २०१७मध्ये ते मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू झाले आणि १६ ऑगस्ट २०१९मध्ये त्यांची फेरनिवड झाली. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं ४३ कसोटींत २५ विजय व १३ पराजय पत्करले आहेत. ५ सामने बरोबरीत सुटले. ७६ वन डे पैकी ५१ विजय , २२ पराजय,  तर ६५  ट्वेंटी-२०त ४३ विजय व १८ पराजय असा शास्त्री यांचा प्रशिक्षक म्हणून प्रवास आहे.

त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियानं दोन वेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत धुळ चारली. ७० वर्षांनंतर भारतीय संघआनं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई संघ ठरला. ४० महिने भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर होता. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे मर्यादित षटकांची मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

विराटच्या आजच्या निर्णयावर शास्त्री यांनी ट्विट केलं की, विराट तू ताठ मानेनं जा. कर्णधार म्हणून तू जे यश मिळवल आहेस, ते फार कमी लोकांना जमलं आहे. तू भारताचा सर्वात आक्रमक आणि यशस्वी कर्णधार आहेस, यात वादच नाही. पण, माझ्यासाठी हा दुःखाचा दिवस आहे, हा संघ आपण दोघांनी मिळून घडवला होता.  

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्री
Open in App