Shahid Afridi vs Jay Shah - भारत-पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना होणार आहे आणि त्याआधीच दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. खर तर IND vs PAK सामन्याची सारे आतुरतेनं वाट पाहत आहेत, परंतु त्यात वादाची ठिणगी काल पडली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCI सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. मग काय, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि सलामीवीर सईद अन्वर यांनी टीका केली.
तुम्ही आशिया चषक खेळणार नसाल, तर आम्ही वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकू! पाकिस्तानकडून BCCIला धमकी
जय शाह यांना प्रशासकीय कारभार कळत नसल्याचा आरोप आफ्रिदीने केला. त्याने ट्विट केले की, मागील १२ महिन्यांत दोन देशांमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यांमुळे दोन्ही देशांत चांगले संबंघ निर्माण होतील, असे वातावरण निर्माण झाले होते. पण, मग ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या सामन्यापूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी असं विधान का करावं? यातून भारतात क्रिकेट प्रशासनाच्या अनुभवाचा अभाव दर्शवतो.
माजी सलामीवीर सईद अन्वर यानेही ट्विट केले की, सर्व आंतरराष्ट्रीय संघ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पाकिस्तान दौऱ्यावर येतात मग BCCI ला काय समस्या आहे. जर बीसीसीआय आशिया चषक २०२३ स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी करत असतील, पुढील वर्षी भारतात होणारा वर्ल्ड कपही तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आशियाई क्रिकेट परिषदेला सदस्यत्व सोडण्याची धमकी देऊन BCCIवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. PCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तर थेट भारतात २०२३मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकीच दिली. Geo Newsने दिलेल्या वृत्तानुसार जय शाह यांच्या घोषणेनंतर PCBच्या अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली.
त्यात BCCIच्या निर्णयावर टीका केली गेली. २०१२ पासून दोन्ही देशांमध्ये मालिका झालेली नाही. २००८मध्ये भारताने आशिया चषक स्पर्धेसाठी शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. ''PCB आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ICC आणि ACC यांनाही हे माहित्येय की पाकिस्तानने भारताता होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचेच नुकसान आहे,''असे PCBच्या अधिकाऱ्याने PTI ला सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Saeed Anwar & Shahid Afridi blasts BCCI Secretary Jay Shah on Asia Cup’s decision, says ‘he doesn’t know cricket administration’
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.