Shahid Afridi vs Jay Shah - भारत-पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना होणार आहे आणि त्याआधीच दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. खर तर IND vs PAK सामन्याची सारे आतुरतेनं वाट पाहत आहेत, परंतु त्यात वादाची ठिणगी काल पडली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCI सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. मग काय, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि सलामीवीर सईद अन्वर यांनी टीका केली.
तुम्ही आशिया चषक खेळणार नसाल, तर आम्ही वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकू! पाकिस्तानकडून BCCIला धमकी
जय शाह यांना प्रशासकीय कारभार कळत नसल्याचा आरोप आफ्रिदीने केला. त्याने ट्विट केले की, मागील १२ महिन्यांत दोन देशांमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यांमुळे दोन्ही देशांत चांगले संबंघ निर्माण होतील, असे वातावरण निर्माण झाले होते. पण, मग ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या सामन्यापूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी असं विधान का करावं? यातून भारतात क्रिकेट प्रशासनाच्या अनुभवाचा अभाव दर्शवतो.
त्यात BCCIच्या निर्णयावर टीका केली गेली. २०१२ पासून दोन्ही देशांमध्ये मालिका झालेली नाही. २००८मध्ये भारताने आशिया चषक स्पर्धेसाठी शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. ''PCB आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ICC आणि ACC यांनाही हे माहित्येय की पाकिस्तानने भारताता होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचेच नुकसान आहे,''असे PCBच्या अधिकाऱ्याने PTI ला सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"