Join us  

Prithvi Shaw Emotional : टीम इंडियात निवड होत नसल्याने भावूक झाला पृथ्वी शॉ; 'साई बाबां'चं नाव घेत म्हणाला... 

पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. अलीकडेच या फलंदाजाने गुवाहाटी येथे आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात ३८३ चेंडूत ३७९ धावांची ( Prithvi Shaw ) विक्रमी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 2:46 PM

Open in App

पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. अलीकडेच या फलंदाजाने गुवाहाटी येथे आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात ३८३ चेंडूत ३७९ धावांची ( Prithvi Shaw ) विक्रमी खेळी केली. यानंतर सर्व क्रिकेट दिग्गज या खेळाडूचे जोरदार कौतुक करत आहेत. त्याचवेळी, खेळीनंतर पृथ्वी शॉ याने PTI शी बोलताना संघात निवड न झाल्याबद्दल आपले मत व्यक्त केले. “मला वाटते की ती पोस्ट फक्त 'साई बाबा' पाहत आहेत की नाही याबद्दल होती. ती अन्य कोणासाठी नव्हती. ही खूप वैयक्तिक गोष्ट होती." पृथ्वीने इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याने लिहिले होते, "आशा आहे की साई बाबा तुम्ही सर्व काही पाहत असाल".

मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो चौथा युवा फलंदाज ठरला. हा विक्रम वासिम जाफरच्या नावावर आहे. त्याने १९९६ मध्ये सौराष्ट्रविरुद्ध १८ वर्ष व २६२ दिवसांचा असताना त्रिशतक झळकावले होते. त्यानंतर सर्फराज खान ( २२ वर्ष व ८९ दिवस वि. उत्तर प्रदेश, २०२०), रोहित शर्मा ( २२ वर्ष व २२९ दिवस वि. गुजरात, २००९) यांचा क्रमांक येतो. पृथ्वीने २३ वर्ष व ६३ दिवसांचा असताना ही कामगिरी केली.

रणजी करंडकमध्ये त्रिशतक झळकावण्यासोबतच पृथ्वी शॉने एक वेगळा विक्रम नावावर केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक, ट्वेंटी-२० सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक अन् 50 षटकांच्या लिस्ट ए विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक, असे भारतातील तिन्ही स्थानिक स्पर्धांमध्ये दबदबा राखणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार पुढे म्हणाला, "कधीकधी तुम्ही निराश होता. तुम्ही तुमचे काम बरोबर करत आहात, हे तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमची प्रक्रिया योग्य प्रकारे करत आहात, तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, तुम्ही तुमच्या करिअरबद्दल आणि मैदानाबाहेर शिस्तबद्ध आहात. पण कधी कधी लोक वेगळे बोलतात. जे तुम्हाला ओळखतही नाहीत ते लोक तुमच्या बाबत मत व्यक्त करतात.”  

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पृथ्वीने हे सर्व सांगितले कारण त्याची संघात निवड होत नाही. त्याने ३७९ धावांच्या शानदार खेळीपूर्वीही अनेक वेळा चांगली कामगिरी केली आहे, परंतु तरीही भारतीय निवड समिती त्याच्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे.   

टॅग्स :पृथ्वी शॉबीसीसीआय
Open in App