सोल - ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने गुरुवारी बीडब्ल्यूएफ विश्व सुपर ५०० कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. माजी नंबर वन सायनाने यजमान देशाची किम गा इयून हिच्यावर ३७ मिनिटांत २१-१८,२१-१८ अशा सरळ गेममध्ये विजय नोंदविला.यंदाच्या राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि आशियाई स्पर्धेचे कांस्य विजेत्या पाचव्या मानांकित सायनाला आता २०१७ ची विश्व चॅम्पियन तसेच जपानची तिसरी मानांकित नोजोमी ओकुहारा हिच्याविरुद्ध खेळावे लागेल. सायनाचा ओकुहारा विरुद्धचा रेकॉर्ड ६-३ असा आहे. गेल्या दोन लढतीत सायना तिच्याविरुद्ध पराभूत झाली आहे.सायनाने गुरुवारी शानदार सुरुवात करीत १०-२ अशी आघाडी घेतली. नंतर ब्रेकपर्यंत ही आघाडी ११-८ अशी झाली होती. नंतर सायनाने वर्चस्व स्थापन करीत १६-१० अशी आघाडी घेतली. कोरियाच्या खेळाडूने सलग सहा गुणांची कमाई करताच १८-१९ अशी बरोबरी झाली. पण सायनाने तीन गुण मिळवून गेम जिंकला.किमने दुसऱ्या गेममध्ये ८-१ अशी सुरुवातीला आघाडी संपादन केली होती. पण सायनाने अनुभव पणाला लावून १०-१३ अशी आघाडी मिळविली. यानंतरही सलग सात गुण संपादन केल्याने सायनाला गेम आणि सामना जिंकण्यात अडचण जाणवली नाही. सायना जानेवारीत इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. यंदा तिने एकच स्पर्धा जिंकली असून एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सहकारी पीव्ही सिंधूवर विजय मिळवून सायनाने सुवर्ण जिंकले होते. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- सायनाची कोरिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक
सायनाची कोरिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक
‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने गुरुवारी बीडब्ल्यूएफ विश्व सुपर ५०० कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. माजी नंबर वन सायनाने यजमान देशाची किम गा इयून हिच्यावर ३७ मिनिटांत २१-१८,२१-१८ अशा सरळ गेममध्ये विजय नोंदविला.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 4:20 AM