मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) मिळणारे मानधन पाहुन क्रिकेटप्रेमी चक्रावले असतील. पण, खेळाडूंना मिळणारे मानधनही काही कमी नाही. यात सर्वाधिक मानधन कर्णधार विराट कोहली घेतो, हे सांगितल्यास आश्चर्च वाटाचला नको. विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी आणि आयसीसीच्या मॅच फी मधील अशी एकूण 1 कोटी 25 लाख 4, 964 रक्कम बीसीसीआयने दिली आहे. बीसीसीआयने खेळाडूंना देण्यात आलेल्या मानधनाची याजी जाहीर केली आहे.
(पुढच्या वर्षी IPLची आफ्रिकन सफारी किंवा आखातात स्वारी?)
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा संपण्याच्या मार्गावर आहे. पाचव्या आणि अखेरच्या कसोटीतही भारतीय संघ पराभूत होण्याची शक्यता अधिक आहे. या मालिकेतील संघाच्या कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीका होता आहे. त्यात त्यांना मिळणाऱ्या मानधनाची रक्कम समोर आल्यानंतर टीकेची धार अधिक तीव्र झाली आहे. त्यात बीसीसीआयने खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक मार्गदर्शक आणि एजेंसी यांना देण्यात आलेल्या मानधनाची यादी जाहीर केली. बीसीसीआयने प्रथमच अशी यादी जाहीर केली आहे.
विराट कोहलीचे वेतन आणि उत्पन्न₹ 65,06,808 : दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी दौऱ्यावरील मॅच फी₹ 30,70,456: दक्षिण आफ्रिकेच्या वन डे मालिकेतील मॅच फी₹ 29,27,700 : कसोटी क्रमवारीमधून आयसीसीकडून मिळणारे मानधनहार्दिक पांड्या वेतन आणि उत्पन्न₹ 50,59,726: जानेवारी ते मार्च 2018 मधील रिटेनरशिप फी₹ 60,75,000: ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 मधील रिटेनरशिप फीचेतेश्वर पुजारा वेतन आणि उत्पन्न₹ 29,27,700: कसोटी क्रमवारीतून आयसीसीकडून मिळणारे मानधन₹ 60,80,725: दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी दौऱ्यावरील मॅच फी₹ 92,37,329: ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 मधील रिटेनरशिप फी₹ 1,01,25,000: जानेवारी ते मार्च 2018 मधील रिटेनरशिप फीइशांत शर्मा वेतन आणि उत्पन्न₹ 55,42,397: जानेवारी ते मार्च 2018 मधील रिटेनरशिप फी₹ 29,27,700: कसोटी क्रमवारीतून आयसीसीकडून मिळणारे मानधन₹ 48,44,644: दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी दौऱ्यावरील मॅच फीजस्प्रीत बुमरा वेतन आणि उत्पन्न ₹ 1,13,48,573: जानेवारी ते मार्च 2018 मधील रिटेनरशिप फी₹ 60,75,000: ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 मधील रिटेनरशिप फीसंपूर्ण यादी पाहण्यासाठी क्लिक करा...