कराची : ब्रिटनमध्ये झालेल्या संशयित बैठकीसंदर्भातील माहिती अद्याप न दिल्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिक देशातील क्रिकेटशी संंबंधित कोणत्याही गोष्टीत सहभागी होऊ शकणार नाही.
मलिक याच्यावर सामना निश्चितीच्या आरोपातून आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र कनिष्ठ न्यायालयाने हा निर्णय बदलला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मलिकला २०१३ मध्ये नोटीस देऊन ब्रिटनमधील काही बैठकांची माहिती देण्यास सांगितले होते. या बैठका त्याने त्याच्यावर २००० साली लावलेल्या बंदीनंतर घेण्यात आल्या होत्या.
आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्राने सांगितले की, ‘मलिकने अद्याप त्या नोटीसचे उत्तर दिलेले नाही. त्यामुळे पीसीबी व आयसीसीने मलिकला क्रिकेट संदर्भातील कोणत्याही गोष्टीत सहभागी होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचे कारण त्याला सांगण्यात येत नाही.
सूत्राने सांगितले, ‘पीसीबीने २००० मध्ये त्याच्यावर बंदी घातली होती. त्यानंतर त्याने ब्रिटनमध्ये काही बैठका घेतल्या. याची माहिती आयसीसीकडे आहे. या बैठकांमुळे संशयाचे वातावरण निर्माण होते. ’ मलिकने बुधवारी आपल्यावरील सामना निश्चितीमुळे लावण्यात आलेली आजीवन बंदी हटवावी, अशी मागणी पाकिस्तानमधील क्रिकेट प्रशासकांकडे केली आहे. मलिकला प्रशिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. (वृत्तसंस्था)
Web Title: Salim Malik cant take up cricket activities until he responds to notice of suspicious meetings says PCB
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.