जगभरात न्यूझीलंडचे क्रिकेटपटू खरे जंटलमन म्हणून ओळखले जातात. साऊदॅम्प्टन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल सुरू होण्यापूर्वीही टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंही किवी खेळाडूंचं कौतुक केलं होतं. ते खूपच विनम्र असल्याचे त्याने म्हटले होते. पण, WTC जेतेपद जिंकल्यानंतर न्यूझीलंडची वेबसाईट AccNZ यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा अपमान केला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टावर पोस्ट केलेला फोटो पाहून जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशात न्यूझीलंड व इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी तो फोटो लाईक केल्याचे पाहायला मिळत आहे.
जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये दोन्ही डावांत कायले जेमिन्सननं टीम इंडियाच्या कर्णधाराची विकेट घेतली. त्यावरून या वेबसाईटनं हा फोटो पोस्ट केला. यात एक महिला हातात पट्टा पकडून आहे आणि तो पट्टा एका पुरुषाच्या गळ्यात दिसत आहे. तो पुरुष खाली जमिनीवर बसलेला आहे. या वेबसाईटनं त्या महिलेवर जेमिन्सन असे नाव लिहिले आहे, तर त्या पुरुषाला विराट कोहली असे नाव दिले आहे. विराट पहिल्या डावात ४४ आणि दुसऱ्या डावात १३ धावांवर बाद झाला.
या फोटोवर तीव्र संताप व्यक्त होत असताना न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अॅलन आणि इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज सॅम बिलिंग ( New Zealand opener Finn Allen and England wicketkeeper-batsman Sam Billings ) यांनी तो फोटो लाईक केल्याचे दिसत आहे. या दोघांनाही विराट कोहलीचे चाहते सोशल मीडियावर झोडून काढत आहेत.
Web Title: Sam Billings and Finn Allen like a distasteful meme showing Kyle Jamieson’s dominance over Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.